Navi Mumbai Crime | धक्कादायक ! नवी मुंबईत कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या; आत्महत्या केल्याचे 15 वर्षाच्या मुलीने भासवले

नवी मुंबई : Navi Mumbai Crime | सतत अभ्यासाचा तगादा लावते, या कारणावरुन झालेल्या वादात 15 वर्षाच्या मुलीने आपल्याला आईचा गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या केल्यानंतर या मुलीने ती आत्महत्या केल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. ही घटना ऐरोलीत 30 जुलै रोजी घडली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या मुलीने हत्या (Navi Mumbai Crime) केल्याची कबुली दिली.

याबाबत रबाळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 41 वर्षाच्या महिलेला आपल्या मुलीने डॉक्टर व्हावे, अशी इच्छा होती. त्यासाठी तिला आतापासून ‘नीट’ परिक्षेची तयारी करावी, यासाठी महिला आपल्या मुलीच्या मागे अभ्यासाचा तगादा लावत होती. त्यावरुन दोघी मायलेकीत अनेकदा भांडणे होत. या घटनेच्या अगोदर या मुलीने आपल्या आईविषयी पोलिसांकडे तक्रारही केली होती. पोलिसांनी तिच्या पालकांना समुदेशनासाठी बोलावले होते.

परीक्षेच्या तयारीवरुन 30 जुलै रोजी दोघींमध्ये पुन्हा एकदा भांडण झाले. यावेळी मुलीने आईला धक्का दिला. त्यामुळे त्या पडून त्यांच्या डोक्याला जखम झाली. त्यावेळी तेथे असलेल्या कराटेच्या बेल्टने मुलीने आईचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर ती आत्महत्या दर्शविण्यासाठी आईच्या मोबाईलवरुन मामाला मेसेज पाठवला. मी सर्व प्रयत्न केले, पण आता माघार घेते, असे तिने मेसेजमध्ये लिहिले.

ही घटना समजल्यानंतर पोलिसांनी या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनाला पाठवून दिला. शवविच्छेदन
अहवालात गळा दाबल्याने मृत्यु झाल्याचे उघड झाले. तसेच बेडवर पडून कोणी आत्महत्या करत
नाही, हे लक्षात आल्याने पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यात तिने आपणच आईची हत्या केल्याची कबुली दिली़.

हे देखील वाचा

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील कचरा व्यवस्थापन पालिकेपुढील ‘आव्हान’; ‘पर्याय’ सुचविण्याचे ‘आवाहन’

Jobs | देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, उघडल्या जाणार अनेक शाखा

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Navi Mumbai Crime | Murder of mother by daughter

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update