नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांची पुन्हा बदली !

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील अनेक दिवसांपासून आयुक्तांच्या बदली होण्याच्या बातम्या येत आहेत. यावरून मध्यंतरीच्या काळात बरंच राजकीय वातावरण तापलं होतं. त्यातच आज नवी मुंबई महापालीका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. नव्या आयुक्तांनी सकाळी पदभार देखील स्विकारला आहे.

नवी मुंबई महापालीका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांची अखेर बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूरचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त अभिजित बांगल यांनी आज सकाळी पदभार स्विकारला असून तत्कालीन आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी अभिजित बांगर यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार सोपवला आहे. यापूर्वी आण्णासाहेब मिसाळ यांची झालेली बदली दुसऱ्या दिवशी रद्द करण्यात आली होती.

नवी मुंबई शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचे प्रमाण रोखण्यात अपयश आल्यामुळे आण्णासाहेब मिसाळ यांची काही दिवसांपूर्वी नगरविकास खात्याने तडका-फडकी बदली केली होती. अचानक झालेल्या बदलीमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. मिसाळ हे फक्त आयुक्त नसून निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती प्रशासक म्हणून केली होती. त्यामुळे त्यांची झालेली बदली सरकारला थांबवावी लागली होती. त्यामुळे बांगर रुजू होण्यापूर्वीच मिसाळ यांच्या बदलीला स्थगिती मिळाली होती.

आयएएस अभिजित बांगर यांनी आज सकाळी अचानक महापालीका मुख्यालयात आले आणि त्यांनी सर्वांना भेट देऊन पदभार स्विकारला. यावेळी मिसाळ हे देखील कार्यालयात कार्यरत होते. मिसाळ यांनी बांगर यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. मिसाळ यांची थांबवलेली बदली झाल्यामुळे महापालीका वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.