Navneet Rana | नितीश कुमारांचे ‘सेक्स ज्ञान’, नवनीत राणांचा संतापल्या, म्हणाल्या – ‘महिलांनी रस्त्यावर…’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Navneet Rana | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी संपूर्ण देशभरातील महिलांचा अपमान केला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाणून बुजून असे राजकीय वक्तव्य केले आहे. यानंतर कोणत्याही राजकीय पक्षांनी त्यांना साथ देऊ नये. ७५ वर्षाच्या व्यक्तीने असे अपशब्द काढल्याने संपूर्ण देशभरातील महिलांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी व्यक्त केली आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांचे शिक्षण (Women Education) आणि लोकसंख्या (Population) याबाबत बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने गोंधळ उडाला आहे.

नवनीत राणा यांनी म्हटले की, महिलांबद्धल आधी विधान करायचे आणि नंतर माफीनामा काढायचा. नितीश कुमार यांनी माफी नाही, तर राजीनामा द्यायला हवा. (Navneet Rana)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावर केलेल्या
वक्तव्यावरुन गोंधळ उडाला आहे.
महिला आयोगापासून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व स्तरांतून नितीश कुमार यांचा निषेध केला जात आहे.
राष्ट्रीय महिला आयोगने (NCW-National Commission for Women) नितीश कुमार यांना तत्काळ देशातील महिलांची माफी मागण्यास सांगितले आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्या वक्तव्यावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या वक्तव्यानंतर नितीश कुमार यांनी माफी मागितली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MLA Rohit Pawar | हसन मुश्रीफांच्या जावयाच्या बेनामी कंपनीला कंत्राट, भाजप लोकांची माफी मागणार का? : आ. रोहित पवार