NCP MLA Rohit Pawar | हसन मुश्रीफांच्या जावयाच्या बेनामी कंपनीला कंत्राट, भाजप लोकांची माफी मागणार का? : आ. रोहित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – NCP MLA Rohit Pawar | भाजपाने (BJP) यापूर्वी मनी लाँड्रींगचा (Money Laundering) आरोप केलेल्या कंपनीला आता सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांना जेवण पुरविण्याचे कंत्राट राज्य सरकारने (State Govt) दिले आहे. ही कंपनी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या जावयाची आहे, कंपनीला कोणताही अनुभव नाही, असे गंभीर आरोप आ. रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी ट्विटद्वारे केले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ब्रिक्स इंडिया कंपनीचे (BRICS India Company) दिलेले कंत्राट ग्रामविकास विभागाने रद्द केले होते. मात्र, आता त्याच कंपनीला सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात जेवण पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीवर सरकार मेहेरबान कसे झाले.

ही कंपनी हसन मुश्रीफ यांच्या जावयाची बेनामी कंपनी असून, कंपनीला कसलाही अनुभव नाही. तरीही आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना चालविण्यासाठी देण्यात आला. त्यात मनी लाँड्रींग झाल्याचा गंभीर आरोप मविआ सरकारच्या काळात भाजपने केला होता. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आणि कोल्हापूर दौराही केला होता. (NCP MLA Rohit Pawar)

आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला सवाल विचारताना या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, आता त्याच
कंपनीला समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील आणि निवासी शाळांमधील विद्याथ्र्यांना भोजन पुरविण्याचे
कंत्राट देण्यात आले. त्यामुळे राजकीय सोयीसाठी खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल भाजप लोकांची
माफी मागणार का?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Accident News | दुर्दैवी ! सांगलीच्या जवानाचा अपघातात मृत्यू

Pune Crime News | बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल; पिंपरी चिंचवडमधील प्रकार

Chhagan Bhujbal | भुजबळांचा गंभीर आरोप, कुणबी प्रमाणपत्र घेऊन यायचे आणि ओबीसींना बाहेर ढकलायचे…