नवाब मलिक यांनी मागीतली जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची लेखी माफी..

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – “आपण वडीलधारी व्यक्ती असुन आपले मन दुखावल्याने मी देखील दिलगीरी व्यक्त करतो” अशी लेखी माफी नवाब मलिक यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांची मागितली आहे.

पुण्यातील हजारे यांचे अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी मलिक यांना कायदेशीर नोटिस पाठवली होती. त्यावर मलिक यांनी पत्राव्दारे लेखी दिलगिरी व्यक्त केल्याचे पवार यांनी कळविले. लोकपाल व लोकआयुक्ताच्या नियुक्तीचा कायदा संमत होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे हे राळेगणसिध्दी येथे दि 30 जानेवारी 2019 पासुन बेमुदत अमरण उपोषणा साठी यादवबाबा मंदिरात बसले होते.

हेही वाचा – ‘त्या’ भाजप लोकप्रतिनिधीची ‘अश्लील क्लिप’ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ  

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथ आयोगाची अंमलबजावणी व्हावी, लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व्हावी, प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा या मागण्या करीत तबल्ल ३८ वेळा पत्रव्यवहार केला. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी हजारे यांच्या पत्रांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबविले व हजारे यांच्या मागण्यांना उत्तर देण्याचे मोदींनी टाळले. यामुळे हजारे यांनी उपोषणाला सुरूवात केली होती. त्यावेळी हजारे यांच्या विषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मलिक यांनी “अण्णा हजारे हे संघ परिवारा कडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात” अशी बदनामी कारक व धादांत खोटी वक्तव्ये एका वृत्त चित्रवाहिनीवर चर्चा करताना केली होती. व त्यानंतर तातडीने महाराष्ट्राचे माजी ऊप मुख्यमंत्री अजित पवार यांनी ताबडतोब नवाब यांनी केलेल्या बदनामी कारक वक्तव्यांबद्दल हजारे यांची माफी मागून दिलगीर व्यक्त केली होती.

मलीक यांनी मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्या विषयी कुठलाही खुलासा केलेला नव्हता. त्यामुळे हजारे यांनी त्यांचे वकील पवार यांच्यामार्फत नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.

व त्या नोटीशीची प्रत महाराष्ट्राचे माजी ऊप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांना देखील रजिस्टर्ड पोस्टाने पाठविली होती.
नवाब मलिक यांनी अ‍ॅड. पवार यांना रजिस्टर्ड पत्राने ऊत्तर पाठवून दिलगीरी व्यक्त केली आहे. “आपण वडीलधारी व्यक्ती असुन आपले मन दुखावल्याने मी देखील दिलगीरी व्यक्त करतो” असे लेखी ऊत्तर नवाब मलिक यांनी पाठविल्याने आपल्याला देखील पुढे या प्रकरणी कोणताही वाद वाढवायचा नाही असे अण्णांनी अ‍ॅड. पवार यांना सांगितले आहे.