Nawazuddin Siddiqui | अखेर नवाजुद्दीन सिद्दिकीने पत्नी आलियाने केलेल्या आरोपांवर सोडले मौन; म्हणाला – ‘माझ्या मुलांचे नुकसान …’

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Nawazuddin Siddiqui | गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी हा त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहे. पत्नीने गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. नवाजुद्दीनच्या पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर आता त्याच्या मोलकरणीनेही त्याच्यावर आरोप केले आहेत. दोन महिन्याचा पगार न दिल्याचा आरोप मोलकरणीने केला होता. परंतु त्यानंतर मोलकरणीने सर्व आरोप मागे घेतले होते. अखेर नवाजुद्दीनने आता या आरोपांवर मौन सोडले आहे. (Nawazuddin Siddiqui)

 

पत्नी आलिया आणि मोलकरणीने गंभीर आरोप केल्यानंतर नवाजुद्दीनने पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे. एका मुलाखतीत बोलताना नवाजुद्दीनने आपल्यावर केलेल्या आरोपावर व्यक्त झाला. यावेळी तो म्हणाला, “मला याबाबत जास्त काही बोलायचे नाही. पण या प्रकरणामुळे माझ्या मुलांचे नुकसान होत आहे. माझी मुलं दुबईत शिकतात आणि या प्रकरणामुळे गेल्या महिन्याभरापासून ते इथेच माझ्याबरोबर आहेत. माझ्या मुलांचे शिक्षण थांबलं नाही पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे”. तर सध्या नवाजुद्दीनचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. (Nawazuddin Siddiqui)

 

नवाजुद्दीनची पत्नी आलिया नवाजुद्दीनच्या बंगल्यावर गेली तेव्हा नवाजुद्दीनची आई आणि तिच्यामध्ये वाद झाला होता.
त्यानंतर नवाजुद्दीनच्या आईने वर्सोवा पोलिसात तक्रार दाखल करत आलिया विरोधात कलम 452, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला.
या तक्रारीनंतर आलियाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.आलियाला चौकशीसाठी बोलावले असता यावेळी आलियाने नवाजुद्दीनवर त्याचबरोबर त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.
यावेळी तिने सांगितले की नवाजुद्दीन व त्याचे कुटुंबीय तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिवाय नवाजुद्दीनच्या कुटुंबियांनी तिचा छळ देखील केल्याचा आरोप तिने केला आहे.
नवाजुद्दीनने खोलीत सीसीटीव्ही लावले असून खोली बाहेर 24 तास गार्ड तैनात केल्याचेही तिने बोलले होते.
2009मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी आणि आलिया हे दोघेही लग्न बंधनात अडकले होते.
त्यांना शोरा नावाची एक मुलगी आणि यानी नावाचा एक मुलगा देखील आहे. आलियाने मे 2020 मध्ये घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला होता.

 

Web Title :- Nawazuddin Siddiqui | nawazuddin siddiqui talk about allegations of wife aliya and maid video

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kasba Peth Bypoll Election | ओबीसींच्या प्रश्नानाकडे भाजपचे दुर्लक्ष – विजय वडेट्टीवार

Hera Pheri 3 |अखेर पुन्हा धुमाकूळ घालण्यासाठी राजू, शामसोबत बाबू भैय्या सज्ज; ‘हेरा फेरी 3’ च्या शूटिंगला झाली सुरुवात

Pune PMC News | सिध्दार्थनगर वासियांच्या घरांसाठी सहा पर्याय; महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव