NCB ला मिळाले अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाचे WhatsApp Chat ! समोर आली धक्कादायक माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्टर अर्जुन रामपाल ( (Arjun Rampal) ची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella Demetriades) चा भाऊ अगिसियाओस डेमेट्रिएड्स (Agisilaos Demetriades) हा मुंबईत लॉकडाऊन काळापासूनच ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्ज केसचा तपास करणाऱ्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या अधिकाऱ्यांनी त्याचा मोबाईल जप्त केला होता. अधिकाऱ्यांनी आता त्याच्या व्हॉट्सॲप चॅट (WhatsApp Chat) चा जुना डेटा शोधून काढला आहे. एका मोठ्या सेलिब्रिटीच्या मदतीनं त्यानं बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं नेटवर्क पसरवल्याची धक्कादायक माहिती या डेटामधून समोर आली आहे.

अशीही माहिती समोर आली आहे की, अगिसियाओस परदेशात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करणार होता. तो काही बड्या ड्रग्ज तस्करांच्या संपर्कातही होता. साऊथ आफ्रिकन, ऑस्ट्रेलियन आणि कोलंबिया मधील काही पेडलर्स देखील त्याच्या संपर्कात होते. इतकंच नाही तर अगिसियाओस परदेशातून ड्रग्ज मागवून भारतात ते कमी किंमतीत विकत होता.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अगिसियाओसचा मोबाईल जप्त करून तो फॉरेन्सिकमध्ये पाठवला होता. यानंतर एनसीबीला त्याचे चॅट्स मिळाले आहेत.

कोण आहे अगिसियाओस डेमेट्रिएड्स ?
अगिसियाओस डेमेट्रिएड्स हा अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ आहे. तो मूळचा साऊथ आफ्रिकेचा रहिवाशी आहे. तो पर्यटक व्हिजावर भारतात आला होता. ड्रग्ज बाळगणं आणि त्याची खरेदी विक्री करणं या त्याला एनसीबीनं ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याला या केसमध्ये ताब्यात घेतल्यानंतर जामीन मिळाला होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.