Mumbai News : विमानतळावर NCB ची मोठी कारवाई, 9 कोटींच्या ड्रग्जसह महिलेला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  मुंबई विमानतळावर एनसीबीच्या मुंबई झोनवर मोठी कारवाई केली आहे. एका दक्षिण आफ्रिकन महिलेला ताब्यात घेऊन तिची झाडझडती घेतली असता तिच्याकडे 2.96 किलो हिरोईन हे ड्रग्ज सापडलं आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात 9 कोटी एवढी किंमत आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. खाणीयसिले प्रॉमिसे असं ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.

समीन वानखेडे यांना एका आंतरराष्ट्रीय तस्कर महिलेबद्दल माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी आपल्या पथकाला त्याबाबत माहिती दिली. यानंतर एनसीबीचं पथक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नजर ठेवून होतं. यावेळी एक संशयित महिला आली. ती मुंबईवरून जोहान्सबर्ग येथे जात होती. जेव्हा या महिलेला ताब्यात घेतलं आणि तिची झडती घेतली तेव्हा तिच्या बॅगेत एक चोरकप्पा आढळून आला. त्यात 2 किलो हिरोईन सापडलं. तिच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात त्यातही आणखी हिरोईन सापडलं. एकूण 2.96 किलो हिरोईन सापडलं.

समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ताब्यात घेतलेली महिला दक्षिण आफ्रिका देशाची नागरिक आहे. या महिलेला एनसीबी कार्यालयात आणून तिला अटक केली आहे. लवकरच तिला कोर्टात हजर केलं जाणार आहे.