विखेंचा पराभव करा असं राजीव गांधींनी सांगितलं होतं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव करा असं कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांनी सांगितल होतं. ती जबाबदारी शरद पवारांनी पार पाडली. असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. विखे आणि पवार यांचे असलेले राजकीय भांडण महाराष्ट्राला सर्वपरिचीत आहे. त्यातच आता निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत.

शरद पवार यांनी कॉंग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणुन, ती जबाबदारी पारपाडली होती, त्यात पवारांचा वैयक्तिक काहीच सबंध नव्हता. आता विखे यांनी आम्हाला पक्षनिष्ठा काय असते ते शिकवू नये आणि भाजपा बरोबर हातमिळवणी करणाऱ्यांनी आघाडी धर्माबद्दल बोलू नये.असे आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हंटले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हंणाले की,शरद पवारांनी माझ्या वडिलांबाबत केलेले विधान दुर्दैवी आहे. जे सध्या हयात नाहीत त्यांच्या विषयी बोलणं हे चुकीचे आहे. पवारांनी अशा प्रकारची टिप्पणी करायला नको होती. यावेळी त्यांनी मुलगा डॉ. सुजय विखे- पाटील यांनी भाजपात प्रवेशासह अनेक मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

माझ्या मुलासाठी नगरच्या जागेवरुन हा सर्व संघर्ष चालू आहे.असे बोलने हे चुकीचे आहे.नगरच्या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सलग तीन वेळा पराभव झाला आहे.त्यामुळे जर नगरची जागा ही कॉंग्रेसला मिळाली असती तर आघाडीची एक जागा वाढली असती,हे त्यामागील खरे गणित होते, शरद पवारांनी केलेल्या वैयक्तीक विधानामुळं आपण दुखावल्या गेलो आहे. असं मतही विखे- पाटील यांनी व्यक्त केल.

ह्याहि बातम्या वाचा –

काँग्रेसच्या काळात १५ सर्जिकल स्ट्राईक झाले ; पण कधी राजकारण केलं नाही

ज्यांच्या चिरंजीवांनी आघाडीतून भाजप प्रवेश केला त्यांनी आघाडी धर्माबाबत बोलू नये

हेलिकाॅप्टर दुर्घटनेतील ‘त्या’ शहीदाच्या कुटुंबीयांना धनंजय मुंडेंची आर्थिक मदत

DELHI : काँग्रेसला मोठा झटका : गांधी कुटुंबियांच्या ‘या’ निकटवर्तीयाचा भाजपमध्ये प्रवेश

फेसबुकवरील मैत्री ज्येष्ठ महिलेला पडली १२ लाखात