NCP Chief Sharad Pawar | दिल्लीतील महिला कुस्तीपटूंवर अन्याय, शरद पवारांचा केंद्र सरकारला इशारा; म्हणाले-‘केंद्र सरकारने गांभिर्याने…’ (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा (Sexual Abuse) आरोप केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन (Delhi Wrestlers Protest) सुरु केले. परंतु, कुस्तीपटूंच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारने (central Government) गांभिर्याने नोंद घ्यावी असे म्हटले. कुस्तीगीर परिषदेची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) माध्यमांशी बोलत होते.

भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष भाजपाचे खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावरून वाद निर्माण झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद (Maharashtra State Kustigir Parishad) विशेष कार्यकारिणी आणि
विशेष सर्व साधारण सभा पुण्यातील वारजे येथे शनिवारी पार पडली.

या सभेला राज्यभरातील 45 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. त्या सभेतील ठरावाबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, दिल्ली येथील महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार केली आहे. त्याबाबत केंद्र सरकारने गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच त्या प्रकरणी दिल्ली सरकारने (Government of Delhi) लक्ष घालून त्या मुलींना न्याय द्यावा. याबाबत बैठकीत ठरावही करण्यात आला असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde)
यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताच ठाकरे गटाचे प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)
‘ऑन कॅमेरा’ थुंकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
यावर शरद पवार यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला.
ते म्हणाले, हे काही राष्ट्राचे, राज्याचे प्रश्न नाहीत. मी त्यावर भाष्यदेखील करू इच्छित नाही आणि त्याला महत्त्वही देऊ इच्छित नाही.

 

Advt.

Web Title :   NCP Chief Sharad Pawar | Injustice against women wrestlers in Delhi, Sharad Pawar’s warning to the central government; He said-‘Central Government seriously…’ (Video)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवा, नांदेड खून प्रकरणावर शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | ‘दुसऱ्या धर्मातील व्यक्तीसोबत लग्न करण्यावर आक्षेप नसावा, पण…’, देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान (व्हिडिओ)

Ajit Pawar | ‘मिठाचा खडा कुणी टाकण्याचा…’, मविआतील जागावाटपावर अजित पवार स्पष्टच बोलले