NCP Chief Sharad Pawar | ‘तव्यावरची भाकरी फिरवली नाही तर करपते, त्यामुळे…’, शरद पवारांच्या विधानामुळे चर्चेला उधाण; पक्षात बदलाचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी (Maharashtra Political News) होताना दिसत आहेत. अनेक राजकीय नेत्यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीबाबत (Mahavikas Aghadi) केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा शांत होत असताना शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढील काळात मोठे बदल (Major Change in NCP) होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

शरद पवार म्हणाले, आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. तव्यावरची भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते, त्यामुळे भाकरी फिरवण्यास विलंब करुन चालणार नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. ते मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Youth Congress) वतीने आयोजित युवा मंथन कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

आता भाकरी फिरवण्याची वेळ आली असून तव्यावरची भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते,
त्यामुळे भाकरी फिरवण्यास विलंब करुन चालणार नाही. समाजात काही व्यक्तिंना पद असो अथवा नसो मात्र
त्यांना कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीत मोठे बदल होणार?

शरद पवार यांनी हे विधान युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात केलं आहे.
त्यामुळे पवारांच्या या वक्तव्यानंतर आगामी काळात राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली
जात आहे. तर पवार यांचा या विधानामागे आणखी काही उद्देश आहे का? याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Web Title :-  NCP Chief Sharad Pawar | major change in ncp has been signaled by sharad pawar

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे क्राईम ब्रँच न्यूज : दुकानातून सिगारेटचे बॉक्स चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड; 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

Whatsapp New Feature | Whatsapp चं नवं फीचर, एक अकाऊंट चार फोनमध्ये वापरता येणार