NCP Chief Sharad Pawar | रोहित पवार मंत्री कधी होणार ? शरद पवार म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) आपली पहिलीच आमदारकीची टर्म गाजवत आहेत. पण, त्यांना मंत्रिमंडळात (Maharashtra Cabinet) स्थान कधी मिळणार अशी अधूनमधून चर्चा रंगलेली असते. शनिवारी (दि.4) पुण्यात झालेल्या एका मुलाखतीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना रोहित पवार कधी नामदार होणार असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर शरद पवार यांनी स्पष्टपणे मिश्कील उत्तर दिले.

 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), आदिती तटकरे (Aditi Tatkare) या युवक आणि आमदारकीची पहिलीच टर्म असलेल्या नेत्यांना थेट मंत्रीपदाची (Maharashtra Minister) संधी मिळाली. मात्र, रोहित पवारांना ही संधी मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. अर्थातच, पवार कुटुंबातील सदस्य असल्याने त्यांच्या नावाला अनेक टिकाकारांनी लक्ष्य केले होते. मात्र, आमदार म्हणून रोहित पवार हे त्यांचे काम करत आहेत. पुण्यातील कार्यक्रमात थेट शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनाच एका कार्यकर्त्याने रोहित पवार नामदार कधी होतील, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी मी आमदार झाल्यानंतर 5 वर्ष थांबलो होतो, असे उत्तर दिले.

पुण्यात पत्रकार ज्ञानेश महाराव (Journalist Gyanesh Maharao) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena leader Sanjay Raut) यांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवारांनी चौफेर फटकेबाजी केली याच कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने शरद पवार यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. मी 1967 साली विधानसभेत गेलो होतो. नामदार होण्यासाठी मी आमदार झाल्यानंतर 5 वर्ष थांबलो होतो, असे उत्तर शरद पवार यांनी दिले. शरद पवार यांच्या उत्तराने रोहित पवार समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीशी निराशा झाली. परंतु पुढच्या टर्मला त्यांना नामदारकी मिळेल अशी चर्चा रंगली.

 

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | NCP chief sharad pawar when will rohit pawar become a minister sharad pawar clearly stated that question

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा