NCP Chief Sharad Pawar | बारसू रिफायनरीबाबत शदर पवारांचा राज्य सरकारला सल्ला, म्हणाले-‘कुठलाही प्रकल्प सुरु करताना…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery Project) स्थानिकांनी विरोध केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीत बारसू रिफायनरी बाबत त्यांना माहिती दिल्याचे सामंत यांनी सांगितले. यानंतर शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले की, उद्योग मंत्र्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. बारसू इथं आंदोलनावेळी पोलीस बळाचा वापर करण्यात आल्याची माहिती समजली.

लोकांना समजून सांगितल्यावर विरोध नाही असंही सामंत यांनी सांगितलं आहे. बारसूबाबत काही घाईने करु नका असा सल्ला उदय सामंत यांना दिला. तसेच उद्या आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करु असं आश्वासन शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी उदय सामंत यांना दिले.

कुठलाही प्रकल्प होताना…

बारसू इथं रिफायनरी प्रकल्पाचा (Ratnagiri Refinery Survey) प्रस्ताव उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सरकारच्या काळातच दिला गेल्याचं सध्या म्हटलं जातंय. पण असा काही प्रस्ताव नाही आणि ही टेबल न्यूज असल्याचे शरद पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी काय पत्र लिहलं मला माहित नाही. मात्र, कुठलाही प्रकल्प होताना स्थानिकांचे मत घेतलं गेलं पाहिजे, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

असा वेडेपणा करु नका

राज्यात भावी मुख्यमंत्री पदावरुन उलट सुलट चर्चा सुरु आहेत. यातच ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांचे बॅनर्स लावले जात आहेत. यासंदर्भात शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, असा वेडेपणा करु नका असं मी अनेकदा सांगितलं आहे.

मुख्यमंत्री बदलाबाबत माहिती नाही

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Thackeray Group MP Sanjay Raut) यांनी राज्यात लवकरच राजकीय
भूकंप होणार असल्याचे वक्तव्य अनेकवेळा केले. यासंदर्भात विचारले असता शरद पवार म्हणाले,
मुख्यमंत्री बदलाबाबत मला माहिती नाही. संजय राऊत हे पत्रकार आहेत, त्यामुळे त्यांना जास्त माहिती असेल.

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar advice to maharashtra govt over barsu refinery project

Join our WhatsApp Group, Telegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 50 हजाराची लाच घेणारा सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Uday Samant | बारसू रिफायनरीसंदर्भात उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर सामंत म्हणाले…

CM Eknath Shinde | महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे