NCP Chief Sharad Pawar | ‘त्यामुळे खारघर घटनेची सत्यता लोकांसमोर येणार नाही’, शंका व्यक्त करत शरद पवारांनी केली ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यानंतर उष्माघातामुळे 14 जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) म्हणाले, खारघर दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला असून याची जबाबदारी ही शिंदे फडणवीस सरकारची (Shinde Fadnavis Government) असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. कडक उन्हात गर्दी जमवून आपल्याला अनुकूल वातावरण करण्याचा डाव शिंदे-फडणवीस सरकारचा असल्याचा आरोप करत या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांमार्फत (Inquiry by Retired Judge) करावी अशी मागणी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केली.

 

शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) पुढे म्हणाले, पक्षाचं शिबीर उन्हाळ्यात घेताना काळजी घेता, मग या ठिकाणी काळजी का घेतली नाही, असा सवाल त्यांनी केला. या घटनेची चौकशी आता अधिकाऱ्यांच्या समितीकडून (Officers Committee) केली जाणार आहे. अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी तो राज्य सरकारच्या विरोधात अहवाल देत नाही. त्यामुळे खारघर घटनेची सत्यता लोकांसमोर येणार नाही. त्यामुळे या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांकडून केली जावी, असे शरद पवार म्हणाले.

 

निष्काळजीपणामुळे 40 जवानांनी जीव गमावला
पुलवामा हल्ल्या (Pulwama Attack) बाबत बोलताना शरद पवार म्हणाले, सरकारच्या निष्काळजीपणामुळे पुलवामा येथे 40 जवानांना जीव गमवावा लागला, असा आरोप त्यांनी केला. देशात सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असून दोन मुलांची भांडणं झाली तर ईडी (ED) मागे लावेल अशी धमकी दिली जात आहे. एवढी ही व्यवस्था घराघरात पोहचली असल्याचे शरद पवार म्हणाले.

 

कोणी पुढे आलेतर कारवाई केली जाते
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर खटला भरला गेला.
त्यांच्यावर आरोप होता की 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption) केला आणि आता आरोपपत्रात सव्वा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे लिहिले आहे.
त्यांच्या शिक्षण व्यवस्थेला एक कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे आणि त्याबाबत त्यांच्यावर खटला दाखल केला.
आता भूमिका घेऊन जर कोणी पुढे येत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाते.
नवाब मलिक (Nawab Malik) यांची केस किती दिवस पुढे ढकलली जात आहे.
राष्ट्रीय पक्षाचा प्रवक्ता आहे म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं.
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप (BJP) सोडली म्हणून त्यांच्या जावयाला तुरुंगात टाकण्यात आलं.
कोणावर अन्याय झाला त्याच्या मागे तागदीने उभे राहिले पाहिजे, त्या प्रवृत्ती विरोधात लढावे लागेल.
मग त्यासाठी कितीही मोठी किंत द्यावी लागली तरी चालेल, असं शरद पवार म्हणाले.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar allegations on kharghar maharashtra bhushan award and eknath shinde devendra fadanvis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | अत्याधुनिक तंत्रज्ञानातून पारदर्शक आणि गतिमान सेवा पुरवाव्यात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

CM Eknath Shinde | प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे