NCP Chief Sharad Pawar | शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकमताने निवड, कार्य समितीत ठराव मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्य समितीत (Working Committee) एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिवेशन दिल्लीत ताल कटोरा स्टेडियम (Tal Katora Stadium) येथे आज (शनिवार) पार पडले. या बैठकीत शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे (NCP Spokesperson Ravikant Varpe) यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

 

 

कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया (Constitution Club of India) येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यसमितिच्या (National Working Committee) बैठकीत आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी (NCP Chief Sharad Pawar) फेरनिवड करण्यात आली आहे. आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वात या देशात पुरोगामी, धर्मनिरपेक्ष सर्वसमावेशक विचारांचा प्रसार करु व भारतीय लोकशाही बळकट करु, असे ट्विट रविकांत वरपे यांनी केले आहे.

 

राष्ट्रवादीच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत शरद पवार यांची सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. या बैठकीला शरद पवार यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), खासदार प्रफुल्ल पटेल (MP Praful Patel), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्याक्षाबद्दल ठराव मांडण्यात आला. या ठरावाला सर्व सदस्यांनी एकमताने मंजूरी दिली.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | sharad pawar elected as national president of ncp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nitin Gadkari | ‘मी सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, सरकारच्या भरवश्यावर राहू नका’, नितीन गडकरींची टोलेबाजी (व्हिडिओ)

Shinde Government | शिंदे गटाला झटका! सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ निर्णयामुळे आमदाराची उडणार दांडी

Supreme Court | सरकारसाठी धडा आहे SC चा निर्णय ! 2 वर्षापासून जेलमध्ये बंद असलेल्या पत्रकाराला सोडताना काय-काय म्हटले, जाणून घ्या