NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांचे मोदींना आव्हान, तुम्ही राष्ट्रवादीवर सिंचन आणि बँक घोटाळ्याचे आरोप केलेत, आता चौकशी करा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळा (Irrigation Scam), राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याचे (State Cooperative Bank Scam) आरोप केले होते. आमची मागणी आहे की, या घोटाळ्यांची त्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले आहे. पवारांच्या या आव्हानामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar) कोंडी होणार आहे.

इंडिया आघाडीचा पहिला मेळावा काल पुण्यातील काँग्रेस भवनात झाला. यावेळी शरद पवार बोलत होते. या प्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते सचिन अहिर यांनी देखील भाजपावर टीका केली.

शरद पवार म्हणाले, भाजपाची ज्या राज्यात सत्ता नाही, त्या राज्यातील सरकारांविरोधात असहकार पुकारण्याची नवी पद्धत मोदी सरकारने सुरू केली आहे. देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करण्याची एकही संधी मोदी सोडत नाहीत.

शरद पवार म्हणाले, ज्या नेत्यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले, त्यांच्याविरोधात द्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे. पंडित नेहरुंनी देशातील संसदीय लोकशाहीला बळकट करण्याचे काम केले. भारताचे मोल जगाला उमजेल, याची जबाबदारी नेहरुंनी पार पाडली. विश्वाने त्यांच्या कार्याची दखल घेतली. पण मोदी त्यांच्या योगदानाला किंमत देत नाहीत. मोदींच्या समोर माईक आला की लगेच ते पंडित नेहरुंवर टीका सुरु करतात.

शरद पवार म्हणाले, शेतातील तण ज्याप्रमाणे उपटतो, त्याप्रमाणे हे सरकार उखडून फेकावे लागेल. भारतीय लोकशाही संविधानावर आधारित असून मागच्या १० वर्षांत लोकशाहीवर हल्ले होत आहेत. आगामी निवडणुकीत मतदारच मोदी सरकारच्या चुकीच्या कामांना उत्तर देतील.

शरद पवार म्हणाले, लोकशाही धोक्यात आलेली असतानाच सामान्य माणसाला एक ना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. युवकांना रोजगार मिळवण्यासाठी धडपडावे लागत आहे. महागाई वाढल्याने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हे सर्व होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

छोटे पक्ष फोडा आणि संपवा! चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना धक्कादायक आवाहन