NCP Chief Sharad Pawar | ‘…तर आपण चुकीच्या मार्गावर जाऊ’, इफ्तार पार्टीत शरद पवारांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मुंबईतील इफ्तार पार्टीला (Iftar Party) हजेरी लावली होती. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, लोकांच्या भल्यासाठी एकतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याची आवश्यकता आहे. देशातील कायद्याचं राज्य अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहोत, असे मत शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं.

 

इफ्तार पार्टीत उपस्थित असलेल्या मुस्लीम बांधवांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले, लोकांच्या भल्यासाठी आपल्याला एकतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याची आवश्यकता आहे. आपला देश कायदा (Law) आणि संविधानावर (Constitution) चालतो. पण संविधान आणि कायद्याकडे दुर्लक्ष करुन पावले उचलण्याची सत्ताधाऱ्यांना सवय लागली, तर आपण चुकीच्या मार्गावर जाऊ, असे शरद पवार म्हणाले.

 

शरद पवार पुढे म्हणाले, समाजात कुणी चुकीचं काम करत असेल, तर त्याचं काय करायचं? याची तरतूद कायद्यात आहे.
मात्र, कायदा आणि संविधानाला दूर ठेवून कायदा हातात घेण्याची भाषा केली जाते, ही बाब देशासाठी योग्य नाही.
त्यामुळे संविधान आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्याला पूर्णपणे सहकार्य करणे आणि या व्यवस्थेला मजबूत करणं,
ही आमची जबाबदारी राहील. याबाबतीत राष्ट्रवादी कधीही माघार घेणार नाही,
असा विश्वास मी येथे व्यक्त करु इच्छितो, असं शरद पवार यांनी सांगितलं.

 

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | ‘…Then we will go on the wrong path’, Sharad Pawar’s criticism of the rulers at the Iftar party (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘अजित पवारांचं वक्तव्य हे फूलस्टॉप नसून कॉमा, अजूनही काहीही होऊ शकतं’

MahaDBT | ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

Maharashtra Political News | अजित पवारांनी संजय राऊतांना का सुनावलं?, संजय शिरसाटांनी सांगितले कारण, म्हणाले…