राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

माजी उप महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी दिपक मानकर यांच्यासह बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी आणि इतरांविरूध्द गुन्हा दाखल आहे.

शहर पोलिस दलातील गनमॅन शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांनी शनिवारी (दि.2) दुपारी हडपसर रेल्वे पोलिस ठाण्याजवळ रेल्वे गाडी समोर उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपुर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये दिपक मानकर, सुधीर कर्नाटकींसह इतरांची नावे आहे. लोहमार्ग पोलिसांनी मानकर आणि इतरांविरूध्द जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तो गुन्हा पुढील तपासासाठी समर्थ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

दरम्यान, दि. 1 जुन रोजी दिपक मानकर यांनी जितेंद्र जगताप हा पैशाची मागणी करीत असून तो आत्महत्या करण्याची धमकी देत असलेल्याबाबतचा एक अर्ज पोलिस आयुक्‍त कार्यालयात आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिला होता. दि. 2 जुन रोजी जितेंद्र जगताप यांनी आत्महत्या केली होती.

समर्थ पोलिसांनी जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी सोमवारी विनोद भोळे, सुधीर सुतार, अमित तनपुरे, अतुल पवार आणि विशांत कांबळे यांना अटक केली होती. दरम्यान, दिपक मानकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला. अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर मंगळवारी (दि.५) सुनावणी झाली. सरकारी पक्षाकडून मानकर यांना जामीन मिळू नये म्हणून युक्‍तीवाद करण्यात आला आणि त्यानंतर दिपक मानकर यांचा अटकपूर्व जामिन न्यायालयाने फेटाळला. बिल्डर सुधीर कर्नाटकी यांचा देखील जामीन अर्ज फेटाळला आहे. मानकर आणि कर्नाटकी यांच्या वतीने अॅड. सुधीर शहा आणि ऋषिकेश गानू यांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने मानकर आणि कर्नाटकी यांच्या अटकपूर्व जामीनासह त्यांचा अंतरीम जामीन देखील फेटाळला आहे, अशी माहिती अॅड. सुधीर शहा यांनी दिली.

गनमॅन शैलेश जगताप यांच्या भावाची आत्महत्या

‘गनमॅन’ शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्‍त केल्याप्रकरणी दिपक मानकर, सुधीर कर्नाटकीविरूध्द गुन्हा

गनमॅन शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांना अटक

दीपक मानकर यांचा जितेंद्र जगतापांच्या आत्महत्येशी काही संबंध नाही – अजित पवार