NCP Crisis | ‘मी जे बोलतोय ते खोटे असेल तर…’, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – NPC Crisis | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंडखोरी करुन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सामील होण्याचा निर्णय घेतला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत असलेल्या मतभेदामुळे अजित पवार यांनी हा निर्णय घेतल्याने पक्षात दोन गट पडलेत. या दोन्ही गटाकडून वेगवेगळे दावे (NPC Crisis) केले जात आहे. अजित पवार हे आमचे नेते असल्याचं प्रफुल्ल पटेल (Prafull Patel), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांच्याकडून सांगितले जात आहे. तसेच अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या घड्याळ चिन्हावर (NCP Party Symbol) दावा केला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाने शरद पवारच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे ठामपणे सांगण्यात येत आहे. हा वाद सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission Of India) आहे. यातच अजित पवार यांची रविवारी कोल्हापूरमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी शरद पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. (NCP Crisis)

अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार पडत होते, त्याचवेळेस राष्ट्रवादीच्या 1-2 आमदार वगळता सर्व मंत्री, आमदारांनी एक पत्र तयार केले होते. या पत्रात आपण महायुतीमधये सामील व्हावं असं म्हटलं होते. हे खोटे असेल तर राजकारणातून निवृत्त होईल आणि हे खरे असेल तर जे खोटे बलतायेत त्यांनी राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे. आहे का तयारी? काहीजण म्हणतात आमच्यावर दबाव होता, होय, आमच्यावर लोकांची कामे करण्याचा दबाव होता. आमदारांच्या मतदारसंघात रखडलेली कामे, विकास कामांना मिळालेली स्थगिती ती उठवण्याचा दबाव होता, असं अजित पवार यांनी सांगितलं.

आम्ही दबावाला भीक घालणारी माणसे नाही

अजित पवार पुढे म्हणाले, आम्ही कुठल्या दबावाला भीक घालणारी माणसे नाही, आम्हीही मराठ्यांची औलाद आहे, आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे बदनामी करण्याचे काम सुरु आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही. मी जे बोलतो ते खरे बोलते आणि वस्तूस्थितीला धरुन बोलतो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. स्वार्थासाठी आम्ही महायुतीमध्ये आलो नाही. आम्ही सत्तेत ही कामे करायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. (NCP Crisis)

जवळची गावे शहरात घेतली नाहीत तर…

दरम्यान, शहर वाढताना अनेक गावे शहरात घ्यावी लागतात. कोल्हापूरकर टोलमाफीसाठी मजबूतीने पुढे आले.
राज्य सरकारला (State Government) वाकावलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन, तुमच्या मनात येते ते तुम्ही करुन दाखवता.
परंतु पुढील 50 वर्षानंतरचं कोल्हापूर डोळ्यासमोर आणा, पुढच्या पिढीचं भविष्य बघा, जवळची गावे तातडीने शहरात
घेतली नाहीत तर शहरे बकाल होतात. पुण्यातील धनकवडी बघा, प्लॅनिंग न होता इमारती उभ्या राहिल्या आहेत,
असे अजित पवार म्हणाले.

…तर त्याला अर्थ राहत नाही

आपण राजकारण न आणता त्यामध्ये एकोपा दाखवा. ज्या ज्या गोष्टी त्या त्या वेळी झाल्या तरच त्याचा फायदा होतो.
फार उशीर केला तर त्याला अर्थ राहत नाही त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे. कोल्हापूरकरांनी या कामात मदत करावी.
विकासाच्या कामाला निधी द्यायला आम्ही कमी पडणार नसल्याचे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चंदननगर: कपड्यांऐवजी पाठविल्या चिंध्या; व्यापारी महिलेची 3 लाखांची फसवणूक

Pune News | शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि थोर गणेशभक्त गजाननभाऊ पंडित याचं निधन

JDS-BJP Alliance | लोकसभा निवडणूकीसाठी जनता दल (सेक्युलर) आणि भाजपाची युती जाहीर; कर्नाटकामध्ये विरोधकांना तगड आव्हान

Benefits Of Vitamin E | ‘या’ 8 गोष्टी आरोग्य सुधारतील, दूर करतील ‘व्हिटॅमिन ई’ ची कमतरता, होतील अनेक फायदे

High Cholesterol | कोलेस्ट्रॉल कमी करतो कारल्याचा ज्यूस, डाएटमध्ये करा समावेश