Benefits Of Vitamin E | ‘या’ 8 गोष्टी आरोग्य सुधारतील, दूर करतील ‘व्हिटॅमिन ई’ ची कमतरता, होतील अनेक फायदे

नवी दिल्ली : Benefits Of Vitamin E | शरीराच्या चांगल्या कार्यासाठी सर्व पोषक तत्वे आवश्यक असतात. यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन ई आहे. व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ईचे फायदे आणि ते कोणत्या पदार्थामधून मिळते ते जाणून घेऊया. (Benefits Of Vitamin E)

१. गव्हाचे तेल

गव्हाच्या बियाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते. सलाड, पास्ता आणि अनेक पदार्थांमध्ये टॉपिंग म्हणून वापरू शकता. (Benefits Of Vitamin E)

२. बदाम

बदाम व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत आहे. आहारात बदाम, बदाम तेल किंवा दुधाचा समावेश करून त्याचे फायदे मिळू शकतात. केस आणि त्वचेसाठीही हे लाभदायक आहे.

३. एवोकॅडो

व्हिटॅमिन-ई आणि पोषक तत्वांनी युक्त असे एवोकॅडो अनेक प्रकारे खाता येते.

४. सूर्यफूलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बिया देखील व्हिटॅमिन ईचा चांगला स्रोत आहेत. सूर्यफुलाच्या बियांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. साल काढून त्या सेवन करा. त्याचे सालीसोबत सेवन केल्याने पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात.

५. पालक

अनेक हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई असते. पालक त्यापैकी एक आहे. पालक हे प्रोटीन, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारख्या इतर अनेक पोषक तत्वांचा देखील स्रोत आहे.

६. हेझलनट

हेझलनट हे व्हिटॅमिन ई व्यतिरिक्त प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियम सारख्या इतर अनेक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे, जे निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.

७. किवी

किवी व्हिटॅमिन ई तसेच व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. यामध्ये असलेले घटक इम्युनिटी वाढवतात.

८. ब्रोकोली

ब्रोकोली देखील आरोग्यदायी पदार्थांपैकी एक आहे. त्यात व्हिटॅमिन ईचे प्रमाण इतर पदार्थांपेक्षा कमी असले तरी त्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियम यासारखे आवश्यक पोषक घटक असतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vagus Nerve Stimulation | व्हेगस नस दाबताच मायग्रेन आणि स्ट्रेससारखे आजार होतील नष्ट, जाणून घ्या याचे आणखी फायदे

Curry Leaves | शरीरासाठी वरदान ही छोटी-छोटी पाने, ब्लड शुगर करतील नष्ट, किंमत अवघी 5 रुपये, वेदनांपासून मिळेल आराम

Health Tips | रिकाम्या पोटी चुकूनही करू नका ‘या’ 5 गोष्टींचे सेवन, पोटात तयार होईल अ‍ॅसिड, लिव्हरचे होईल नुकसान

Skin Care Tips | चेहर्‍यावरील मुरुमांनी त्रस्त आहात का? मग ‘या’ 4 प्रकारे करा लाल चंदनाचा वापर