High Cholesterol | कोलेस्ट्रॉल कमी करतो कारल्याचा ज्यूस, डाएटमध्ये करा समावेश

नवी दिल्ली : High Cholesterol | कारले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयर्न आणि पोटॅशियम यांसारखे पोषकतत्व आढळतात. कारल्याचा ज्यूस नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते (Bitter Gourd Juice Benefits in High Cholesterol).

कोलेस्ट्रॉल वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत. यासोबतच खाण्याच्या सवयींवरही विशेष लक्ष दिले पाहिजे. हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी कारल्याचा रस फायदेशीर मानला जातो. (High Cholesterol)

कारले अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. कारल्याचा ज्यूस प्यायल्याने त्वचा सुधारते. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. कारल्यातील अँटिऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. कारले हृदयरोगींसाठी खूप फायदेशीर आहे. कारल्याचा ज्यूस प्यायल्याने हाय कोलेस्ट्रॉल कमी होते. कारल्याचा ज्यूस नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते. (High Cholesterol)

कारल्याच्या ज्यूसचे सेवन कसे करावे?

  • एक कारले घ्या.
  • ते सोलून घ्या आणि नंतर त्याचे लहान तुकडे करा.
  • आता मिक्सरमध्ये टाकून ज्यूस बनवा.
  • रोज सकाळी या ज्यूसचे सेवन करा.

यामुळे हृदयाच्या आजारांपासून तुमचा बचाव होईल. ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होते. कारल्याचा ज्यूस त्वचेसह एकुणच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण कोणतीही गंभीर समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कारल्याचा ज्यूस घ्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vagus Nerve Stimulation | व्हेगस नस दाबताच मायग्रेन आणि स्ट्रेससारखे आजार होतील नष्ट, जाणून घ्या याचे आणखी फायदे

Curry Leaves | शरीरासाठी वरदान ही छोटी-छोटी पाने, ब्लड शुगर करतील नष्ट, किंमत अवघी 5 रुपये, वेदनांपासून मिळेल आराम

Health Tips | रिकाम्या पोटी चुकूनही करू नका ‘या’ 5 गोष्टींचे सेवन, पोटात तयार होईल अ‍ॅसिड, लिव्हरचे होईल नुकसान

Skin Care Tips | चेहर्‍यावरील मुरुमांनी त्रस्त आहात का? मग ‘या’ 4 प्रकारे करा लाल चंदनाचा वापर