NCP Hasan Mushrif ED Raid | खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘हे ईडीचे सरकार, जे त्यांच्या विरोधात बोलतात त्यांच्यावर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP Hasan Mushrif ED Raid | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागल येथील घरावर ईडीने छापे टाकले. ईडीच्या कारवाईनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) हल्लाबोल केला आहे. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवरुन (NCP Hasan Mushrif ED Raid) सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आमच्याकडून कोणत्याही चौकशीला पूर्णपणे सहकार्य केले जाईल. आमच्याकडे लपवायला खरंच काहीही नाही. अतिथी देवो भव, आमच्याकडे पाव्हणे आलेत त्यांचे स्वागत करुन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच राज्यात ईडी म्हणजे एकनाथ-देवेंद्र यांचे सरकार आहे. जे सरकारच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई केली जात आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, एक गोष्ट प्रांजळपणे मला या ईडी सरकारला (ED Government) सांगायची आहे. ही अशी कटकारस्थाने करण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचा विकास, बेरोजगारी आणि महागाईवर लक्ष दिलं तर मायबाप महाराष्ट्राच्या जनतेचं भले होईल. नुकतेच एक वृत्त आले आहे की, ज्यामध्ये आरटीआयद्वारे (RTI) अशी माहिती समोर आली की, देशातील 90 ते 95 टक्के विरोधी पक्षातील लोकांवर धाडी पडल्या आहेत किवा त्यांच्यावर आरोप झाले आहेत.

हे ईडीचे सरकार

महाराष्ट्रातील सरकार तर अभिमानाने स्वत;ला ईडी सरकार म्हणते. ईडी सरकार म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार. जे त्यांच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करताना दिसत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

या सरकारने गैरवापराची परिसीमा गाठली

यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव घेतल्याशिवाय बातमी होत नाही.
आमच्यावर इतके लोक आरोप करतात कारण त्याशिवाय त्यांची हेडलाईन होत नाही.
माझे त्यांना आवाहन आहे की, तुम्ही या गोष्टी करत रहा. हा तुमचा अधिकार आहे.
पण सत्तेचा गैरवापर करण्याची परिसीमा या सरकारने गाठल्याचे त्यांनी म्हटले.

Web Title :- NCP Hasan Mushrif ED Raid | NCP MP supriya sule criticized shinde fadnavis government over hasan mushrif ed raid

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | फक्त विरोधकांवरच कारवाई का? मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांचा सवाल

Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागलमधील घरावर ईडीची छापेमारी

Maharashtra Politics | विधानपरिषद उमेदवारी अन् देवेन भारतींच्या नियुक्तीवरून शिंदे गटात नाराजीचा सूर