NCP Jayant Patil On Ajit Pawar Group | जयंत पाटलांचा अजित पवार गटाला टोला; म्हणाले – ‘राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – NCP Jayant Patil On Ajit Pawar Group | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा?, यावर सध्या निवडणूक आयोगासमोर (EC India) सुनावणी सुरू आहे. मागच्या शुक्रवारी याबाबत सुनावणी झाली. आता पुन्हा सुनावणी होणार आहे. मात्र, अजित पवार गटाने पक्षावर दावा सांगताना सुनावणीदरम्यान जी कारणे सांगितली त्यानंतर शरद पवार गट आक्रमक झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला विचारलं तरी तो सांगेल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. (NCP Jayant Patil On Ajit Pawar Group)

जयंत पाटील हे तळेगाव एमआयडीसीमध्ये जनरल मोटर कामगारांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी सरकारला केले.

अजित पवार गटावर टीका करताना जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला जरी विचारले की
राष्ट्रवादी कोणाची, तरी तो शरद पवारांची, असेच उत्तर देईल. निवडणूक आयोगाने जर यात बदल केला तर
महाराष्ट्रातील जनता ते सहन करेल, असे मला वाटत नाही.

शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाने थेट शरद पवार यांच्यावर आरोप करणारी कारणे आयोगासमोर सांगितली.
तसेच सुनावणीनंतर देखील शरद पवार यांच्यावर छगन भुजबळ यांनी टीका केली होती.
यानंतर जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आक्रमकपणे प्रतिक्रिया देत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kalpana Giri Murder Case | काँग्रेसच्या महिला पदाधिकारी कल्पना गिरी हत्याकांडातील दोघांना जन्मठेप, चौघांना ३ वर्षांची सक्त मजुरी; साडेनऊ वर्ष चालला खटला