आव्हाडांनी दिलं गणेश नाईकांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘मला दर 10 वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांच्यात बऱ्याच दिवसापासून शाब्दिक टीकाटिप्पणी चालू आहे. गणेश नाईक यांनी जितेंद्र आव्हाडांना फिल्मी स्टाईलने म्हटले होते की, ‘ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक.’ त्यांच्यावर जितेंद्र आव्हाडांनी पलटवार केला आहे की, ‘मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही’ अशा कठोर शब्दांत गणेश नाईकांवर टीका केली आहे.

आव्हाड म्हटले की, ‘मी एकदा नवी मुंबईत गेलो तर गणेश नाईकांनी कथकल्लीच सुरु केली आहे. मी एकदा काय तर शंभरवेळा जाईल. आणि यानंतर माझा बापदेखील येईल, मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही’ अशी बोचरी टीका त्यांनी केली. तसेच ते म्हणाले की, ‘मी स्वतःचे डायलॉग स्वत: मारतो, मी स्वत: लिहितो आणि स्वत:च्या आवाजात मारतो’ असे देखील त्यांनी म्हटलं. यावेळेस आव्हाडांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती देखील केली. ते म्हणाले वाढलेली गावठाण सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काय केलं, आगरी लोकांची घरे मोडली जात होती तेव्हा काय केलं असे प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केले.

तसेच आव्हाडांनी नाईकांवर आरोप केला की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गणेश नाईक यांनी पक्ष संपवला. नाईकांच्या सांगण्यावरूनच नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार आणि खंडणी चालू असल्याचा दावा देखील आव्हाडांनी केला. एवढेच नाही तर त्यांनी मलाही संपवण्याचा डाव आखला होता, अशीही टीका आव्हाडांनी केली. तसेच त्यांनी खंत व्यक्त केली की, नाईक यांच्यामुळे ठाणे- कल्याण- डोंबिवली- अंबरनाथ आदी शहरात पक्ष कमकुवत होत होता असे शरद पवारांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र पवारांनी माझ्यापेक्षा गणेश नाईकांवर विश्वास दाखवला.

दरम्यान गणेश नाईकांनी स्पष्ट केले की आव्हाड म्हणतात की गणेश नाईकांच्या सांगण्यावरून नवी मुंबईत खंडणी वसूल केली जाते, पण गणेश नाईकवर साधी एनसी देखील नाही, हिम्मत असेल तर पुराव्यांसह गुन्हा दाखल करा. असे उत्तर त्यांनी आव्हाडांच्या टीकेला दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांच्यात बऱ्याच दिवसापासून शाब्दिक टीकाटिप्पणी चालू आहे. गणेश नाईक यांनी जितेंद्र आव्हाडांना फिल्मी स्टाईलने म्हटले होते की, ‘ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक.’ त्यांच्यावर जितेंद्र आव्हाडांनी पलटवार केला आहे की, ‘मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही’ अशा कठोर शब्दांत गणेश नाईकांवर टीका केली आहे.