NCP Leader Ajit Pawar | चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर अजित पवारांचे नागरिकांना आवाहन; म्हणाले, “ही भाषा बदलण्याची ताकद तुमच्यात…..”

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर त्यांचे मत मांडले. त्यानंतर आज पुण्यातील दुसऱ्या कार्यक्रमात अजित पवारांनी (NCP Leader Ajit Pawar) भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानावर कडाडून टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. ‘फुले, आंबेडकर आणि कर्मवीर हे अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या,’ असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानंतर सर्व सामाजिक स्तरांतून त्यांच्या विधानाचा निषेध केला जात आहे.

त्यानंतर अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनीही चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले, “फुले-आंबेडकरांनी अनुदानासाठी सरकारवर अवलंबून न राहता, त्यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असं विधान आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. वाह रे पठ्ठ्या… आपण रक्कम दिली तर त्याला देणगी दिली, असं म्हणतो किंवा लोकवर्गणी दिली म्हणतो. त्या काळात भाऊराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू केली होती. जुन्या लोकांना हे आठवत असेल. प्रत्येकानं शिक्षण घेतलं पाहिजे, हा भाऊराव पाटील यांचा विचार होता. त्या काळात काही लोकांनी कर्मवीरांना शाळेसाठी जमिनी दिल्या, तर काही लोकांनी खोल्या बांधून दिल्या होत्या. याचा अर्थ त्यांनी भीक मागितली का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागितली का? कुठले शब्द कसे वापरायचे? यांचं भान राखलं पाहिजे. अरे तुम्ही पुण्यासारख्या ‘विद्येचं माहेरघर’ असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात.”

पुढे उपस्थित नागरिकांना उद्देशून अजित पवार म्हणाले, “ही जी भाषा वापरली जातेय,
ही भाषा बदलण्याची खरी ताकद तुमच्यात आहे. कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला घरी पाठवायचं
आणि कुणाला शेती बघायला लावायची, हे तुमच्या हातात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मतदानाच्या अधिकारांतर्गत हा अधिकार तुम्हाला दिला आहे.”

Web Title :- NCP Leader Ajit Pawar | ncp leader ajit pawar on chandrakant patil statement about mahatma phule babasaheb ambedkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ATS | लष्कर-ए-तोयबाच्या दोन संशयितांना पुणे न्यायालयाकडून जामीन; पुणे एटीएसने केली होती अटक

NCP MLA Amol Mitkari | मुख्यमंत्र्यांनाच वाटत नाही ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर….असे म्हणत अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका