Pune ATS | लष्कर-ए-तोयबाच्या दोन संशयितांना पुणे न्यायालयाकडून जामीन; पुणे एटीएसने केली होती अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेत (Terrorist Organization) सामील असल्याच्या संशयावरून पुणे दहशतवादविरोधी पथकाने (Pune ATS) दोन संशयितांना अटक (Arrest) केली होती. अटक करण्यात आलेल्या दोघांची पुणे सत्र न्यायालयाने (Pune Sessions Court) जामिनावर सुटका (Bail Granted) केली आहे. पुणे एटीएसने (Pune ATS) या संशयित आरोपींविरोधात यूएपीए कायद्यांतर्गत (UAPA Act) गुन्हा (FIR) दाखल केला होता. त्यांच्याविरोधात आयपीसी 124(अ) आणि 153 (ब) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

 

आरोपींचा जामीन मंजूर करताना न्यायालयाने, आरोपींचा दहशतवादी संघटनेत सहभाग असल्याचा कोणताही पुरवा नसल्याचे निरीक्षण नोंदवले. एटीएसने (Pune ATS) अटक केलेल्या एका आरोपीचा मोठा भाऊ हा जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडला आहे. महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) जम्मू आणि काश्मीरमधील रहिवासी असलेल्या आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (Aftab Hussain Abdul Jabbar Sha) आणि मोहम्मद युसूफ अत्तू (Mohammad Yusuf Attu) यांना मे आणि जून महिन्यांत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याची योजना आखल्याबद्दल अटक केली होती.

 

एटीएसच्या पथकाने मोहोम्मद जुनैदला (Mohammad Junaid) मे महिन्यात पुण्यातून ताब्यात घेतले होते.
जुनैद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील असून, पुण्यात तो भंगाराचा व्यवसाय करत होता.
तसेच एटीएसने उत्तर प्रदेशातील इनामुल हक (Inamul Haq) यालादेखील अटक केली होती.
लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असलेल्या प्रकरणात हक हा याआधीच अटकेत आहे.

न्यायालयाने आदेशात म्हटले की, आफताब आणि युसूफ यांचा जुनैदसोबत संबंध असल्याचे दिसत नाही.
जुलैदने आफताबशी संपर्क साधला आणि त्यांच्या संभाषणात फरार आरोपी उमरचा उल्लेख आहे.
परंतु, आफताब दहशतवादी कारवाया अथवा दहशतवादी संघटनेत सामील होता का, याचा अंदाज या संभाषणावरून लावता येणार नाही.
युसूफने जुनैदच्या खात्यावर पैसे जमा केले. मात्र, पैसे हस्तांतर करण्यापूर्वी आणि नंतर त्यांच्यात कोणतेही संभाषण झाले नाही.
त्यामुळे युसूफने अन्य कोणाच्या तरी सांगण्यावरून जुनैदच्या खात्यात दहा हजार रुपये ट्रान्सफर केले
असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.

 

Web Title :- Pune ATS | no evidence of terror link pune court gives bail to two who arrested by ats for allegedly recruiting for lashkar e taiba pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut | ‘कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलू देत आम्हाला घेणे-देणे नाही; आमचे मुख्यमंत्री तोंड कधी उघडणार?’ – संजय राऊत

Ahmednagar Crime | कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन न केल्याने विद्यार्थ्याची शिक्षिकेला शिवीगाळ

Sulochana Chavan Passed Away | लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास