राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘सिरम’ला केंद्र सरकारनं धमकी दिली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना (Corona) प्रतिबंधक कोविशिल्ड (Covishield) ही लस (Vaccine) उत्पादित करणाऱ्या पुण्यातील (Pune) सिरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) जून महिन्यात 10 कोटी डोस देण्याचे कबूल केले होते. परंतु केंद्र सरकारने (Central Government) सीरमला धमकी दिल्याने डोस मिळाले नाहीत. एकीकडे राज्य सरकारला डोस द्यायला सांगायचे आणि दुसरीकडे कंपन्यांना धमक्या देण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी केला आहे.

राज्य सरकारच्या शिवस्वराज्य उपक्रमाचा प्रारंभ हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा परिषदेत (Ahmednagar Zilla Parishad) झाला.
त्यांनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकार (Central Government) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी त्यांनी अमेरिकेने 25 कोटी डोस दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि उपाध्यक्षा भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांचे आभार मानत स्तुतीसुमने उधळली.

PM मोदींनी छत्रपतींचा आदर्श ठेवावा
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा
आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम करावे,
अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सध्या सुरु असलेल्या लसीकरणावर बोलताना मुश्रीफ म्हणाले,
लसीकरणासाठी एकच राष्ट्रीय धोरण असावे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारने आणि त्यापुढील वयोगटातील नागरिकांना केंद्र सरकारने Central Government लस द्यायची, हे धोरण योग्य नाही.

तर प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावू
पश्चिम बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्यात येत आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो तर त्यापुढील नागरिकांच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो, असा गोंधळ देशात सुरु आहे.
असे असेल तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे फोटो प्रमाणपत्रावर लावू.

अमेरिकेच्या अध्यक्षांचे मानले आभार
अमेरिकेने आपल्याला लसींचे 25 कोटींचे डोस दिले, असे सांगत मुश्रीफ यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांचे आभार मानले.
ते म्हणाले, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा भारतीय वंशाचा कमला हॅरिस यांचे आभार मानले पाहिजेत.
अमेरिकेच्या निवडणुकीत आपल्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांचा प्रचार केला.
नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करुन भारतात आणले.
असे असले तरी याचा आकस न धरता, भारतीयांवर अन्याय होऊ नये यासाठी आपल्याला 25 कोटी लसीचे डोस देण्याचे अमेरिकेने ठरवले आहे.
त्यामुळे त्यांचे आभार. अमेरिकेच्या अध्यक्षांचे मन किती मोठं आहे, हे यावरुन लक्षात येते, असे मुश्रीफ म्हणाले.