NCP MLA Disqualification Case | पक्षविरोधी कृत्य केल्याने आमदारांना अपात्र का करु नये? शरद पवार गटाने नोटीशीला दिले 10 पानी उत्तर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणी (NCP MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांच्या समोर सुनावणी सुरू आहे. पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे शरद पवार गटाच्या (Sharad Pawar Group) आमदारांना अपात्र (NCP MLA Disqualification Case) का करु नये? अशा आशयाची याचिका अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) अध्यक्षांकडे दाखल केली होती. या संदर्भातील विधीमंडळाच्या नोटीशीला शरद पवार गटाने १० पानी उत्तर देत आपले म्हणणे मांडले आहे.

विधिमंडळाने शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (MLAs Jayant Patil) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांना आधीच नोटीस बजावली होती. मागील आठवड्यात आमदार अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षीरसागर या ८ जणांना नोटीस बजावली. तर ३ आमदारांना नोटीस पाठवली नव्हती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षांकडे शरद पवार गटाने नोटीशीला उत्तर दिले असून प्रत्येक आमदाराने १० पानी उत्तर सादर केले आहे. आता यावर विधानसभा अध्यक्ष कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अजित पवार गट कोणते म्हणणे मांडणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. (NCP MLA Disqualification Case)

विशेष म्हणजे या प्रकरणी आमदार नवाब मलिक (MLA Nawab Malik) यांना नोटीस पाठवण्यात आलेली नाही.
नवाब मलिक यांनी सध्या तटस्थ राहणे पसंत केले आहे.
नवाब मलिकांनी राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटाला पाठिंबा अद्याप जाहीर केलेला नाही.

सुप्रिम कोर्टाने (Supreme Court) मागील सुनावणीत पुन्हा एकदा या प्रकरणात निर्णयासाठी होत असलेल्या
विलंबावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावत त्यांचे वेळापत्रक फेटाले होते.
तसेच ३१ जानेवारी २०२४ ही शेवटची मुदत दिली असून या मुदतीपूर्वी नार्वेकर यांना निर्णय देणे आता बंधनकारक राहणार आहे.

तसेच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी (Shivsena MLA Disqualification Case)
अंतिम निर्णय घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतची शेवटची मुदत दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Deepak Mankar | महापालिकेच्या सेवानिवृत्तांना थकबाकी एकरकमी देण्याची मागणी;
‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे आयुक्तांना पत्र