अहमदनगर प्रकाराची जितेंद्र आव्हाड यांना लाज वाटते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर महानगर पालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपची सरशी झाली आहे. संख्याबळाच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपला हा सत्तेचा पेढा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिलेल्या पाठींब्यामुळे खायला मिळाला आहे. त्या प्रकरणाबद्दल राष्ट्रवादीचे बडे नेते बोलायला तयार नसून जितेंद्र आव्हाड यांनी मात्र त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी पत्रकार विजय  चोरमले यांच्या ट्विटर हॅन्डल वरील  ट्विटला रिट्विट करून नगरच्या प्रकाराबद्दल आपल्याला लाज वाटते असे म्हणत माफी मागितली आहे.
Capture.JPG

एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आपल्या विचारधारेच्या पक्षांशीच युती करण्याच्या गोष्टी करत असताना पक्षातील काही मंडळी मात्र अशी भाजपा सोबत लगड करत असल्याने राष्ट्रवादीची चांगलीच नाचक्की होत चालली आहे. तर राष्ट्रवादीने नगरच्या त्या सर्व नगरसेवकांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याच प्रमाणे आमदार संग्राम जगताप यांच्या बद्दल हि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांमध्ये असंतोष खदखदू लागला आहे. तर या निवडणुकीसाठी संग्राम जगताप यांनी महत्वाची भूमिका बजावली असून त्यांच्यावर असणाऱ्या हत्या प्रकरणातील आरोपामुळे त्यांच्यावर भाजपने दबाब टाकला अशी चर्चा आहे. तर संग्राम जगताप भाजप मध्ये जाणार अशीही चर्चा आहे. भाजपच्या गोटात राष्ट्रवादीचे नगरसेवक जाऊन त्यांनी भाजपला पालिकेवर सत्ता मिळवून दिली हि बाब पक्षाला विचार करायला लावणारीच आहे. परंतु या विषयावर एक शब्द सुद्धा बोलायला भाजप नेते तयार नाहीत असेच चित्र पाहण्यास मिळते आहे.

काल नेमके काय झाले होते नगरमध्ये महापौर निवडणुकी दरम्यान 

अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकी दरम्यान भाजपचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांना ३७ मते मिळून ते महापौर झाले तर राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बावस्कर यांनी निवडणूक प्रक्रिया सुरु होताच आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला पाठींबा दिला नसता तर बहुमताचे एवढे दिव्य भाजप पार करू शकलीच नसती. म्हणून राष्ट्रवादीच्या प्रदेश स्तरावरच्या नेत्यांची या प्रकारामुळे मोठी नाचक्की झाली.

अशी मिळाली भाजपला मते

भाजप  १४

राष्ट्रवादी १८

बसपा  ४

अपक्ष १

एकूण : ३७ 

अहमदनगर महानगरपालिका पक्षीय बलाबल 

शिवसेना -२४

भाजप – १४

राष्ट्रवादी – १८

काँग्रेस – ५

बसपा  – ४

समाजवादी पार्टी – १

अपक्ष – २