NCP MLA Rohit Pawar | ‘वाटेल ती किंमत मोजू पण …’, सत्ताधाऱ्यांचा उल्लेख करत रोहित पवारांचा थेट इशारा; म्हणाले – ‘पुरोगामी विचार टिकावा म्हणून…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी राजकीय आश्रय घेणाऱ्या टोळीचा उल्लेख करत थेट इशारा दिला आहे. सोशल मीडियावर (Social Media) व्यक्त होणाऱ्या पुरोगामी विचारांच्या (Progressive Thought) तरुणांना राजकीय आश्रय असणाऱ्या टोळीकडून त्रास दिला जात आहे. संबंधित तरुणांना नोकरीवरुन काढण्यासाठी ते काम करत असलेल्या कंपनीला संपर्क साधून दबाव टाकला जात आहे, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुरोगामीत्वावर होणारे हल्ले रोखण्यासाठी वाटेत ती किंमत मजू पण राजसत्तेच्या आड लपून पुरोगामीत्वावर होणारे हल्ले आम्ही खपवून घेणार नाही, असा थेट इशारा रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी ट्विट करुन दिला आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी ट्विटमध्ये म्हटले, सोशल मीडियावर पुरोगामी विचारांचा एक मोठा तरुण वर्ग आहे. महाराष्ट्राचा हा पुरोगामी विचार टिकावा म्हणून या विचारसरणीच्या नेत्यांना या युवा वर्गाकडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठं समर्थन मिळतंय. अर्थात काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि मा. पवार साहेब (Sharad Pawar) हे पुरोगामी विचारांचे पाईक असल्याने त्यांना या युवा वर्गाचा मोठा पाठींबा आहे आणि त्यादृष्टीने आपल्या लिखाणातून ते सोशल मिडियात वेळोवेळी व्यक्त होत असतात. मात्र या युवा वर्गाला एका राजकीय आश्रय असलेल्या टोळीकडून जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या टोळीमध्ये प्रामुख्याने एकतर महिला आहेत किंवा महिलांच्या नावाने काढलेली अकाऊंट आहेत.

या टोळीकडून सोशल मिडियातील या युवांच्या अकाऊंटवर अत्यंत गलिच्छ भाषेत कमेंट करुन या युवांनी त्यांच्याविरोधात चुकीची भाषा वापरावी, अशा पद्धतीने उद्युक्त केलं जातं आणि त्यांना प्रत्युत्तर दिल्यास महिला असल्याचा गैरफायदा घेत लगेच पोलिसांत तक्रार केली जाते. एरवी महिलांवर अत्याचार (Abuse of women) होत असताना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्यास दिरंगाई करणाऱ्या सरकारच्या दबावाखालील पोलिस (Police) यंत्रणेकडूनही या युवांना तत्परतेने अटक (Arrest) केली जाते, असंही रोहित पवार यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

याशिवाय पुरोगामी विचारधारेला मानणाऱ्या सोशल मिडियातील या व्यक्ती, मुलं, मुली जिथं कुठं काम करत असतील त्या कंपन्यांनाही फोन करुन किंवा ई-मेल करुन यांना कामावरुन काढून टाकण्यासाठी दबाव आणला जातो. हा अत्यंत हीन, संतापजनक आणि लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्याच्या मुळावर घाव घालणारा प्रकार आहे. एखाद्याची भूमिका पटत नसेल तर थेट त्याच्या नोकरीवर किंवा त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू पाहाणाऱ्या या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी या मुलांच्या बाजूने आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत.

सर्वसामान्य कुटुंबातील या मुलांचं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आम्ही कुणालाही हिरावू देणार नाही.
यासाठी वाटेल ती किंमत मोजू पण राजसत्तेच्या राजाश्रयाआड लपून पुरोगामीत्वावर होणारे हे हल्ले आम्ही खपवून घेणार नाहीत.
राजसत्तेनेही राजकीय विरोधकांविरोधातील विचारांची लढाई ही समोरासमोर आणि विचारांनीच लढावी.
महिलांना पुढं करुन किंवा महिलांच्या नावाने अकाऊंट काढून त्यांच्या पदराआडून हल्ले करणं हे कोणत्याही राजसत्तेला शोभणारं नाही,
असंही रोहित पवार म्हणाले.

Web Title :  NCP MLA Rohit Pawar | rohit pawar on social media attacks by political influence group tweet

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा