NCP MLA Vidya Chavan | राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांचे भगव्या वस्त्रावरुन वादग्रस्त विधान, म्हणाल्या – ‘भोदूगिरी करणारे बाबा…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण (NCP MLA Vidya Chavan) यांनी भगव्या वस्त्रावरुन (Saffron Cloth) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भोंदूगिरी करणारे बाबा भगवी वस्त्र धारण करतात, असे वक्तव्य विद्या चव्हाण (NCP MLA Vidya Chavan) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सुरु असलेल्या ‘जनजागर यात्रे’वेळी (NCP Jan Jagran Yatra) त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

 

विद्या चव्हाण (NCP MLA Vidya Chavan) म्हणाल्या, सावित्रीच्या लेकींचा जागर आम्ही सुरु केला असून हा जागर महागाई, बेरोजगारी संदर्भात आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून मोदींची सत्ता असून त्यांनी केवळ घोषणा केल्या आहेत. खाजगीकरणामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rate) शंभरच्या वर गेले आहेत. यामुळे महागाई वाढली आहे. तसेच अन्नपदार्थावर पाच टक्के जीएसटी (GST) लावली आहे. आपण अकार्यक्षम आहोत हे जनतेला सांगण्यापेक्षा रोज नवीन काही तरी वाद निर्माण करायचा आणि लोकांचे लक्ष विचलीत करायचे, असे प्रकार सुरु आहेत, असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.

 

 

कोणीतरी भगवा धारी येतो
केंद्र (Central Government) आणि राज्य सरकारने (State Government) महागाई आणि बेरोजगारी यावर बोललं पाहिजे. मात्र कोणीच बोलत नाही. कधी भगाव्याचे राजकारण केलं जातं, कोणीतरी भगवा धारी येतो, योगी येतात. मी देखील हिंदू आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातील सर्व मंदिरांमध्ये मोठी गर्दी झाली होती. मात्र कुणी भगवी वस्त्र घातली नव्हती. भगवा हे त्यागाचे प्रतीक असून भोगीचं नाही, हे लोक भगवा घालून फिरतात हे चुकीचे असल्याचे विद्या चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्री भोंदूगिरी करतात
मुख्यमंत्री शिंदे कामाख्या देवीली जातात पण त्यांना राज्यातील देवी दिसत नाही. कारण त्या ठिकाणी जादूटोणा चालतो. मुख्यमंत्रीच जादूटोणा करत असतील तर त्यांनाच आधी जेलमध्ये टाकले पाहिजे. भोंदूगिरी करणारे बाब भगवी वस्त्र धारण करतात, मुख्यमंत्री भोंदूगिरी करतात. यामुळे त्यांचे महागाई कडे लक्ष नाही. शंभर कोटी रुपयांचा आरोप करणारे कमीश्नर कुठे गायब झाले? त्यांची साधी चौकशी तरी केली का? असा हल्लाबोल विद्या चव्हाण यांनी केला.

 

 

Web Title :- NCP MLA Vidya Chavan | ncp leader vidya chavan controversial statement on saffron clothes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी-गुजरात को देंगे’, जयंत पाटलांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Former MLA Mohan Joshi | कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी मोहन जोशी

Anil Deshmukh | काटोल, नरखेड तालुक्यातील जनतेच्या प्रमुख मागणीचे अनिल देशमुखांकडून मुख्यमंत्र्याना पत्र…