NCP MP Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी मानले नितीन गडकरींचे आभार, म्हणाले – ”दिलेला शब्द खरा केला!..”

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार समर्थक (NCP Sharad Pawar Group) खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (BJP leader Nitin Gadkari) यांचे एक्स अकाउंटवर पोस्ट करून आभार मानले आहेत. नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर, वाघोली ते शिरूर या तिन्ही एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या (Elevated Corridor) कामाची प्रक्रिया सुरू झाल्याने कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी हे आभार मानले आहेत.

अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, दिलेला शब्द खरा केला.! माननीय नितीन गडकरींचे आभार! आपल्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळालं! नाशिक फाटा ते चांडोली, तळेगाव चाकण शिक्रापूर, वाघोली ते शिरूर या तिन्ही एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कंत्राट निघाले आहेत. मायबाप जनतेला ही बातमी सांगताना मला अत्यंत समाधान वाटतंय!

अनेक वर्षांपासून प्रलंबित राष्ट्रीय महामार्गावरील हे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार झाल्यापासून मी अविरतपणे प्रयत्न
करत होतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (National Highway Authority)
वेळोवेळी पाठपुरावा केला, अनेकदा बैठका घेतल्या, भेटी घेतल्या, पत्रव्यवहार केले. संसदेत सुद्धा हा मुद्दा उचलून धरला
आणि आज या तिन्ही एलिव्हेटेड कॉरिडॉरचे टेंडर निघाले आहेत. आता लवकरच प्रत्यक्षात काम सुरू होईल व मायबाप जनतेला रोजच्या वाहतूक कोंडीतून (Traffic Jam) कायमचा दिलासा मिळेल! (NCP MP Amol Kolhe)

आपल्या सर्वांच्या साथीने निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण करू शकलो, त्याचं समाधान वाटत आहे.
नितीन गडकरींकडे सातत्याने पाठपुरावा केल्यावर त्यांनी हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते व त्यांनी
मागणीला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिला आहे. त्याबद्दल मी त्यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या
(Shirur Constituency) मायबाप जनतेच्या वतीने मन:पूर्वक आभार मानतो! जय शिवराय!, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Intelligence Bureau Bharti | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, आयबीमध्ये मोठी भरती, लवकर करा अर्ज, प्रक्रिया सुरू

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांनी पोलीस प्रशासनाची बाजू उचलून धरत पालकांना दिला दोष, ”१४ व्या वर्षी हातात मोबाईल…”

Post Viral On Social Media | लवकरच पुलवामा सारखा हल्ला होईल ! सोशल मीडियावर विद्यार्थ्याची पोस्ट; झारखंडमधील विद्यार्थी अटकेत, संरक्षण मंत्री काश्मीर दौर्‍यावर

NCP MP Amol Kolhe | अमोल कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू, राज्य सरकारवर ओढला आसूड, ”फक्त दिल्लीसमोर माना खाली घालून…”

Solapur Karmala Accident News | शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या चार भाविकांचा कार अपघातात मृत्यू; आठ महिन्यांची मुलगी बचावली

Pune Police Inspector Transfers | पुण्यातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, कोंढवा, अलंकार पोलिस स्टेशन आणि वाहतूक शाखेत नियुक्त्या