NCP MP Amol Kolhe | याचिकेतून नाव वगळल्यानंतर अमोल कोल्हे थेट अजित पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : NCP MP Amol Kolhe | शरद पवार गटातील (Sharad Pawar Group) चार खासदारांना अपात्र करा, या मागणीसाठी अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. मात्र, याचिकेतून शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अमोल कोल्हे यांची नावे वगळली आहेत. यानंतर खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) हे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भेटण्यासाठी विधान भवनात (Vidhan Bhavan) पोहचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अजित पवार यांच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे यांनी सुरूवातीला अजित पवार गटाला समर्थन दिले होते, तसे प्रतिज्ञापत्र दिल्याचा दावा देखील सुनिल तटकरेंनी (Sunil Tatkare) काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र, नंतर अमोल कोल्हे शरद पवार गटात दाखल झाले. आता याचिकेतून नाव वगळल्यानंतर कोल्हे पुन्हा अजित पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चेला उधाण आले आहे.

अजित पवार गटाने वंदना चव्हाण (Vandana Chavan), फौजिया खान (Fauzia Khan) आणि मोहम्मद फैजल (Mohammad Faisal) यांच्यावर कारवाईची मागणी याचिकेतून केली आहे. मात्र अमोल कोल्हे आणि शरद पवार, सुप्रिया सुळे यांची नावे याचिकेतून का वगळली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (NCP MP Amol Kolhe)

मात्र, या प्रश्नांची उत्तरे मिळत नसतानाच अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत.
अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिला असला तरी या गटात ते सक्रिय नसल्याचे दिसत आहे, अंतर राखून आहेत.
तसेच अजित पवार गटावर अमोल कोल्हे कोणत्याही प्रकारचे भाष्य करणे टाळतात.

शिवाय, अजित पवार यांच्या शपथविधीला कोल्हे राजभवनात उपस्थित होते. यामुळे आज पवार-कोल्हे भेटीनंतर विविध
अंदाज वर्तवण्यात येत आहेत. सध्या निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून सुनावणी सुरू आहे.
यामध्ये अमोल कोल्हे आमच्या बाजूने असल्याचे शरद पवार गटाने म्हटले आहे.
या सुनावणीबाबत चर्चा करण्यासाठी अमोल कोल्हे गेले असावेत, असा देखील अंदाज काहीजण वर्तवत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

आता अजित पवार गटाची मागणी, ४ जणांची खासदारकी रद्द करा; मात्र, शरद पवारांसह तिघांना वगळले