NCP MP Amol Kolhe | भाजपा-शिंदे-पवार गटावर अमोल कोल्हेंचा निशाणा, ”रामायणात सीतामाईचं, तर कलियुगात पक्ष-चिन्हाचं अपहरण”

शिर्डी : NCP MP Amol Kolhe | रामायणात सीतामाईचे अपहरण झाले होते, कलियुगात पक्ष आणि चिन्हाचे अपहरण होत आहे, असे मला नारायणगावमधील परिचित व्यक्तीने सांगितले. मी त्यांना म्हणालो, नुसते पक्ष आणि चिन्हाचे नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचेही अपहरण झाले आहे, असे म्हणत खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी भाजपा (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) – अजित पवार गटावर (Ajit Pawar Group) जोरदार टीकास्र सोडले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर शिर्डी येथे सुरू असून काल याच शिबिरात बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awad) यांनी श्रीरामाबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. त्यानंतर आज खासदार अमोल कोल्हे यांनी रामायणाचा दाखला देत भाजपा आणि एकनाथ शिंदे – अजित पवार गटावर निशाणा साधला.

अमोल कोल्हे म्हणाले, सध्या देशात राम मंदिराची चर्चा आहे. अनेकजन विधाने करत आहेत. काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारीच आहे, असे म्हणतात. त्यांना सांगू इच्छितो, प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे, तेवढेच आमचे आहेत. चार खांद्यावरून नेताना आम्हीही जय राम श्री राम, जय जय राम म्हणतो.

(NCP MP Amol Kolhe) अमोल कोल्हे पुढे म्हणाले, पण आमच्या मंदिरातील श्रीरामचंद्र हे धनुष्यबाण ताणलेले नाहीत.
तर ते आशीर्वादाचा हात उंचावलेले, माता सीतामाई, बंधू लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासह कुटुंबवत्सल प्रभू श्रीरामचंद्र आहेत.

अमोल कोल्हे म्हणाले, ग्रामीण भागात एकमेकांना राम राम म्हणतात.
राम राम म्हटल्याने माणूस जोडला जातो. राम राम म्हणून माणूस जोडणारा देश आम्हाला हवा आहे.

भाजपावर टीका करताना कोल्हे म्हणाले, प्रभू श्रीरामाविषयी शिकवताना, एकवचनी, एकबाणी, एकपत्नी असल्याचे सांगितले
जाते. तिसऱ्या विषयावर मी जाहीर बोलणार नाही. पण एकबाणी आणि एकवचनी या तत्त्वांबाबत बोलले पाहिजे.
निवडणुकीच्या आधी वचने द्यायची आणि मग चुनावी जुमला असल्याचे सांगून टाळायचे, अशांना प्रभू श्रीराम कसे पावतील?

अमोल कोल्हे म्हणाले, प्रभू श्रीरामांनी लंकेला जाऊन सीतामाईंना सोडवले, स्त्रीचे रक्षण करणारे श्रीराम होते.
पण आमच्या महिला कुस्तीपटूंवर काय वेळ आली, ते देशाने पाहिले. महिला कुस्तीपटूंना जर कुस्तीलाच राम राम ठोकावा
लागत असेल आणि सत्ताधारी महिलांचे शोषण करणाऱ्यांना आश्रय देत असतील तर त्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील?

अमोल कोल्हे म्हणाले, सीतामाईचे हरण झाले, तेव्हा कांचनमृग होता. त्याच्यापाठी धावत असताना सीतामाईंचे
अपहरण झाले. आता कांचनमृगाचे रुपडे बदलले आहे. कांचनमृगाने सोन्याचे कातडे नाही तर ५० खोक्यांचे जॅकेट घातले
आहे आणि जसे मृगाच्या बेंबीत कस्तूरी असते, तशी ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाकडून वाचण्याची कस्तूरी
या नव्या कांचनमृगाकडे आहे, अशी जोरदार टीका अमोल कोल्हे यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPS officer Rashmi Shukla | रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, पहिल्या महिला पोलीस महासंचालक

Pune Municipal Corporation (PMC) | अनधिकृत बांधकाम करणाऱ्या ‘त्या’ 11 जणांवर गुन्हा दाखल करा, पुणे मनपाचे भारती विद्यापीठ पोलिसांना पत्र

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक, पिस्टल व काडतूस जप्त