NCP MP Dr. Amol Kolhe | राष्ट्रवादीमधील भूकंपानंतर खा. डॉ. अमोल कोल्हेंवर मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची मोठी खेळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NCP MP Dr. Amol Kolhe | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP Crisis) मोठी फुट पडली आहे. अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज आणि शरद पवार यांचे विश्वासू आमदार राष्ट्रावादीमधून बाहेर पडले. अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षात घडलेल्या घटनेनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षसंघटना मजूबत करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Dr. Amol Kolhe) यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

 

अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे (NCP Rebellion) पक्षातील अनेक पदे रिक्त झाली आहेत. राष्ट्रवादीकडून बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने अनेक पदाधिकाऱ्यांवर विविध पदांची जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President Jayant Patil) हे अनेक पदांसाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत आहेत.

 

राष्ट्रवादीत पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या जात असताना मोठी बातमी समोर आली आहे. 2024 मध्ये लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2024) होणार आहेत. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कधीही निवडणूका (Local Body Elections) जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मोठी खेळी केली आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Dr. Amol Kolhe) यांच्यावर मोठी आणि महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती (Campaign Chief )केली आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना नियुक्तीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र प्रभारी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), कोषाध्यक्ष माजी आमदार हेमंत टकले (Former MLA Hemant Takle), पालघर जिल्हा अध्यक्ष आमदार सुनील भुसारा, (MLA Sunil Bhusara), प्रदेश सरचिटणीस आदिती नलावडे (Aditi Nalavde), प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे (Sandeep Bedse), मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव (Rakhi Jadhav), युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख (Mahebub Shaikh), विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे (Sunil Gavane), युवक प्रदेश उपाध्यक्ष अमोल मातेले (Amol Matele) हे उपस्थित होते.

 

अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

अमोल कोल्हे यांची प्रचार प्रमुख पदी नियुक्ती केल्यानंतर त्यांनी ट्विटरद्वारे आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी माझी नियुक्ती करण्यात आली.
माझ्यावर हा विश्वास दाखवत ही जबाबदारी दिल्याबद्दल आदरणीय शरद पवार साहेब,
महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो!
आपण सर्वांनी दाखविलेला हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेल!, असं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

 

 

Web Title : NCP MP Dr. Amol Kolhe maharashtra politics ncp crisis mp amol kolhe has been appointed as
campaign chief of state nationalist congress party

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा