NCP MP Supriya Sule | शिक्षण मंत्र्यांची उमेदवार मुलीला भर कार्यक्रमात ‘डिस्कॉलिफाय’ करण्याची धमकी, सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या…

मुंबई : NCP MP Supriya Sule | शिक्षक भरतीची (Teacher Recruitment) वेबसाईटवरील प्रोसेस कधी सुरु होणार, असा प्रश्न परीक्षेची तयारी करणाऱ्या एका मुलीने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना (Deepak Kesarkar) एका कार्यक्रमात विचारल्याने सत्तेच्या गुर्मीत असलेले मंत्री महोदय संतापले. त्यांनी सदर मुलीला धमकावले की, शिक्षक भरतीतून तुमचे नाव डिसक्वालिफाय (Disqualify) करु. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, मुलीला धमकावणाऱ्या केसरकरांनी माफी मागावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यातील कपिलधारा येथील कार्यक्रमातील दीपक केसरकरांचा हा व्हायरल व्हिडिओ आहे. शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना आवरावे, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना केली आहे.

सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी यासंदर्भात एक ट्विट केले असून त्यामध्ये म्हटले आहे की,
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला डिसक्वालिफाय करण्याची धमकी
देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय? असा प्रश्न पडतो.
एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहीर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात.

खासदार सुळे यांनी ट्विटमध्ये पुढे लिहिले आहे की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की
या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच
जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती.
तसेच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहीर माफी मागितली पाहिजे, असे सुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
मात्र, अद्याप दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | नातेवाईकांच्या नावाने फर्म बनवून इंनटेक्स कंपनीला 2 कोटींचा गंडा; पिंपरी चिंचवड परिसरातील प्रकार; 22 वर्षीय तरुणीसह परराज्यातील चौघांवर FIR

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर, छगन भुजबळांसारख्या…

Pune Pimpri Crime News | मनाविरुद्ध मुलाला जन्म दिल्याने विवाहितेचा छळ, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला अटक; भोसरी परिसरातील घटना