पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | मुलाला जन्म देण्यास विरोध असताना देखील महिलेने मुलाला जन्म दिल्याच्या कारणावरुन पती आणि सासू-सासऱ्यांनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने (वय- 23) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली. ही घटना शनिवारी (दि.25) गवळीनगर भोसरी येथे घडली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भोसर पोलिसांनी (Pimpri Police) पती व सासूला अटक केली आहे. (Pune Pimpri Crime News)
याबाबत मयत महिलेचे वडिल रमेश रामभाऊ चोपडे (वय-53 रा. मलकापूर, जि. बुलढाणा) यांनी रविवारी (दि.26) भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी पती पवन प्रल्हाद तायडे (वय-29 सध्या रा. गवळीनगर, भोसरी, मुळ रा. हनुमान नगर, चांदूर पिसवा, ता. नांदुरा, जि. बुलढाणा), सासरे प्रल्हाद लक्ष्मण तायडे (वय-66) आणि सासू यांच्यावर आयपीसी 304(ब), 306, 498(अ), 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करुन पती व सासूला अटक केली आहे. (Pune Pimpri Crime News)
Pune Pimpri Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर, आरोपी फिर्य़ादी यांच्या मुलीला मार्च 2020 पासून शारीरिक व मानसिक त्रास देत होते.
नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन दहा लाख रुपये आणावेत, तसेच मनाविरुद्ध मुलाला जन्म का दिला या कारणावरुन
तिचा वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केला. तिला शिवीगाळ करुन मारहाण केली.
सासरच्या लोकांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या 23 वर्षीय मुलीने राहत्या घरामध्ये गळफास
घेऊन आत्महत्या केली. विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन पती
व सासूला अटक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पद्मभुषण गायकवाड (API Padma Bhushan Gaikwad) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
| तळेगाव दाभाडे : सुरक्षा रक्षकाला कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साईटवर चोरी, एकाला अटक