NCP on Shivsena | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हात लावला तर तलवारीने…, NCP आमदाराने थेट मित्रपक्ष शिवसेनेलाच दिला इशारा

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – NCP on Shivsena | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पायउतार झाल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील समन्वय कायम आहे. आपल्या विरोधी पक्षांचा सामना करण्यासाठी हे तिनही पक्ष एकत्र येत असल्याचे सातत्याने दिसत आहे. मात्र, अमरावतीमध्ये काहीतरी वेगळाच प्रकार घडला आहे. तिथे स्थानिक राजकारणातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या आमदाराने शिवसेनेला थेट (NCP on Shivsena) तलवार काढण्याची धमकी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देवेंद्र भुयार (NCP MLA Devendra Bhuyar) यांनी हे वक्तव्य केले असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर प्रथच शिवसेना आणि राष्ट्रवादीत येथे वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. (NCP on Shivsena)

राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी थेट शिवसेनेलाच इशारा देताना म्हटले आहे की, मुंबईच्या ठाकरेंची (Thackeray) दहशत (Terror) कालही आहे, आज ही आहे आणि उद्या सुद्धा आहे. तुमची ही दहशत नदीच्या काठापर्यंत आहे. आमच्या राष्ट्रवादीच्या नादाला लागायचे नाही. देवेंद्र भुयारच्या नादाला तर लागूच नका.

देवेंद्र भुयार यांनी म्हटले की, शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत (Shivaji Education Institute Election) तुम्ही जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.
या नंतर जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही.
हे तुम्ही ध्यानात ठेवा, जुना देवेंद्र भुयार अंगात आणू नका.

आमदार भुयार यांनी म्हटले की, 50 गद्दार आमदार गुजरातमार्गे गुवाहाटीला गेले आणि सरकार पाडले.
अलिबाबा चाळीस चोरांचे हे सरकार आहे. या सरकारने आमचा कोट्यवधीचा निधी रोखला आहे.
काही लोक जाणीपूर्वक बदनामी करत आहे. मला जर भाजपमध्ये (BJP) जायचे असते तर तेव्हाच गेलो असतो आणि
गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेऊन आलो असतो. पण लोकांनी माझ्या या वागण्यावर तोंडात शेण घातले असते.

Web Title :- NCP on Shivsena | the terror of mumbais thackerays is still present say ncp mla devendra bhuyar warning to shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS Deepotsav | मनसेच्या दीपोत्सवात शिंदे-फडणवीस हजर, युतीची चिन्हे!

Pune Crime | फसवणुकीच्या गुन्ह्यात कपील धिंग्रा आणि त्यांच्या पत्नीला जामीन मंजूर

Rain in Maharashtra | दिवाळीवर पावसाचे सावट; परतीचा पाऊस लांबला