उस्मानाबाद : महागाई विरोधात राष्ट्रवादीचे पिठलं भाकरी आंदोलन

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

महागाईच्या विरोधात देशभर वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने होताना दिसत आहेत . मात्र उस्मानाबादेत एक अनोखेच आंदोलन करण्यात आले आहे. महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी तर्फे आज चक्क पिठलं भाकरी आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. कार्यालयासमोर चूल मांडून पिठलं भाकरी आंदोन करीत सरकार वर महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी प्रचंड घोषणाबाजी केली. आणि सरकारचा निषेध केला.

यावेळी , २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने महागाई कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. पण प्रत्यक्षात महागाई अनेक पटीने वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल १४७ रुपये प्रती बॅरल असतानाही २००८ मध्ये युपीए सरकारने पेट्रोलचे दर ५५ तर डिझेल दर ३८ रुपये प्रतिलिटर इतकाच ठेवला होता. कच्चे तेल ६५ रुपयांवर येऊनही पेट्रोल ८६ तर डिझेल ७३ रुपयांना विकले जात आहे.

करांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकार लूट करीत असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला. गॅस सिलिंडरही ७१४ रुपयांवर गेले आहे.
रेशन दुकानातून धान्यही मिळत नाही. जिल्हा रुग्णालयात औषधे उपलब्ध नाहीत. यातून सरकारने नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप करुन महिला राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी तीन चुली मांडल्या. त्यावर भाकरी आणि पिठलं शिजवून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. नंदा पुनगुडे, सक्षणा सलगर, वंदना डोके यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील हेही सहभागी झाले होते.