NCP Yugendra Pawar | अजितदादांच्या विरोधात सख्खा पुतण्या मैदानात, युगेंद्र पवार म्हणाले, ”पवार साहेब म्हणतील तसं…”

बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार (NCP Yugendra Pawar) हे बारामतीच्या मैदानात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बाजूने प्रचाराला उतरताना दिसत आहेत. आज त्यांनी बारामतीमधील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यालयाला अचानक भेट दिली. ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार हे पूत्र आहेत.

श्रीनिवास पवार हे अजित पवार यांच्यासोबत प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे उभे असल्याचे आजपर्यंत पहायला मिळाले आहे. मात्र, युगेंद्र यांनी आजोबा शरद पवार यांच्या बाजूने जाणे पसंत केल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार गट आमने-सामने येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरणार असल्याने येथे भावजयी विरूद्ध नणंद असा सामना रंगणार आहे. पवार कुटुंबात अशाप्रकारे फुट पडलेली असताना युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या बाजूने उभे राहणे पसंत केले आहे.

युगेंद्र पवार यांनी आज बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधला. बारामती लोकसभेसाठी कोणत्या गटाच्या उमेदवाराचा
प्रचार करणार? असा प्रश्न विचारला असता युगेंद्र पवार म्हणाले, साहेब म्हणतील तसे मी करणार आहे.
तसेच पार्थ पवार आणि जय पवार ही अजित पवारांची दोन्ही मुले अजित पवार गटाच्या प्रचारासाठी आधीच मैदानात उतरली आहेत. याबाबत युगेंद्र पवार म्हणाले, सर्वच भाऊ प्रचाराला उतरले ही चांगली बाब आहे. निवडणुकीसाठी अजून एक महिना बाकी आहे, त्यामुळे पुढे काय होते ते बघू.

कुटुंबात मला एकटे पाडले जात आहे, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
यावर युगेंद्र पवार म्हणाले, मला वाटत नाही अजित पवारांना एकटे पाडले जात असावे.
राजकारण वेगळे आहे आणि कुटुंब वेगळे आहे. सुप्रिया सुळे या अतिशय चांगल्या खासदार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Solapur Rural Police | एमडी ड्रग्स प्रकरणातील आंतर राज्य टोळीचा मुख्य सूत्रधार सोलापूर पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून मेफेड्रॉन जप्त, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : कोंढव्यात घरकाम करणाऱ्या मुलीवर बलात्कार

पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस छोट्या सिलेंडरमध्ये भरुन चोरी; लोखंडी पिनद्वारे करत होता गॅस ट्रान्सफर

पुणे : घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी, ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन