ओळखीच्या मित्रांनीच केले ‘त्या’ माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवणे येथे राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक सुधाकर शिरसाट यांचे त्यांच्या ओळखीच्या मित्रांनीच अपहरण केले असल्याचे पोलीसांच्या तपासात पुढे आले आहे.

विनायक शिरसाट व त्याचे वडिल सुधाकर हे शिवणे, उत्तमनगर या परिसरातील बेकायदा बांधकामांविषयी पीएमआरडीकडे तक्रार करीत होते. त्यातून काही ठिकाणी पीएमआरडीने कारवाई केली होती. त्यामुळे विनायक शिरसाट यांचे याच कारणावरुन अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, त्यांच्या हत्येमागे माहिती अधिकारच्या कारणापेक्षा वेगळेच कारण पुढे येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अशी माहिती पुढे आली आहे.

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या 

विनायक शिरसाट हे ३० जानेवारीला घरातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या ओळखीचे ३ मित्र होते. ते घरी परत न आल्याने त्यांची पजेरो गाडी नऱ्हे येथे सोडून दिल्याचे आढळून आले. त्यामुळे अगोदर बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा शोध घेऊन ते परत न आल्याने ५ फेब्रुवारी रोजी अपहरणाची फिर्याद नोंदविण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विनायक शिरसाट हे घरातून निघाल्यानंतर ते मित्रांबरोबर नऱ्हे येथे आले व तेथे त्यांच्या गाडीतून त्याचे अपहरण करुन दुसऱ्या गाडीने त्यांना पिरंगुट लवासा रोडला नेण्यात आले. त्यानंतर मुठा गावाजवळ त्यांचा खुन करुन त्यांचा मृतदेह दरीत टाकून देण्यात आला असे पोलीसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

याप्रकरणी विनायक शिरसाट यांचे भाऊ किशोर शिरसाट यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तपास करीत असताना त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मुठा गावाच्या हद्दीत मिळून आले. गेल्या काही दिवसांपासून भारती विद्यापीठ पोलीस त्यांचा शोध घेत होते. पिरंगुट ते लवासा या रोडवरील मुठा गावापासून काही अंतरावर असलेल्या घाटात खोल दरीत सोमवारी दुपारी एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. त्यांच्या अंगावरील कपडे आणि खिशातील मोबाईल यावरुन त्यांचे भाऊ किशोर यांनी हा मृतदेह विनायक शिरसाट यांचा असल्याचे ओळखले.
Loading...
You might also like