फ्रान्सच्या 96% हायस्कूलमध्ये लावण्यात आली आहेत ‘कंडोम वेंडिंग मशीन’, जाणून घ्या कारण

पॅरिस : वृत्तसंस्था – अलिकडच्या एका संशोधनात या गोष्टीचा खुलासा झाला आहे की, काही काळापूर्वी वाईटप्रकारे एड्सला बळी पडलेल्या फ्रान्सच्या 96 टक्के हायस्कूलमध्ये कंडोम वेंडिंग मशीन्स आहेत. सुरक्षित लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देणे आणि कमी वयात होणार्‍या गर्भधारणेची जोखीम कमी करण्यासाठी फ्रान्सच्या शाळांमध्ये अशा वेडिंग मशीन्स लावण्यात आल्या आहेत, ज्यामधून कंडोम्स घेता येऊ शकतात.

फ्रान्समध्ये पहिली कंडोम वेंडिंग मशीन 1992 मध्ये लावण्यात आली होती. तेव्हा सरकारच्या या निर्णयावर शाळा प्रशासन आणि समाजातील काही वर्गाने विरोध दर्शवला होता. मात्र, लवकरच या निर्णयाचे लोकांनी स्वागत सुद्धा केले. फ्रान्समध्ये, मागच्या वर्षी शिक्षण मंत्रालयाद्वारे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार, राज्याकडून निधी घेणार्‍या सुमारे 96% हायस्कूल-पब्लिक स्कूल आणि खासगी शाळांमध्ये कंडोम वेंडिंग मशीन आहेत.

एका राज्यात विकले गेले सर्वात जास्त 26 मिलियन कंडोम
स्टेटिस्ताच्या एका रिपोर्टनुसार, 2019 मध्ये इले-दे-फ्रान्स असे क्षेत्र होते जिथे सर्वात जास्त सुमारे 26 मिलियनपेक्षा जास्त कंडोम विकले गेले होते. यानंतर ऑवरगने-रॉन-अल्पेस मध्ये जवळपास 14.6 मिलियन कंडोम विकले गेले होते. मात्र, तरूण पीढीमध्ये सुरक्षित लैंगिक संबंधांबाबत असलेली परंपरा मोडणारा फ्रान्स एकमेव देश नाही. संयुक्त राज्य अमेरिकेत सुद्धा सार्वजनिक शाळांमध्ये कंडोम वाटण्यात आले होते.