स्वीडन पीएमओमध्ये ‘ही’ भारतीय महिला सल्लागार म्हणून नियुक्त 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञ अशोक विखे पाटील यांची कन्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जानेवारीत स्वीडनच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार हाती घेतलेले स्टीफन लोफवन यांच्यासोबत त्या काम करतील.

पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक, कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घर बांधणीचे काम पाहतील नीला पाहतील अशी माहिती अशोक विखे पाटील यांनी दिली. स्वीडन येथे जन्म झालेल्या नीला या स्टॉकहोम महापालिकेच्या निवडणूक समिती सदस्यही आहेत. नीला यांनी पदवीनंतर गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांसह एमबीए केले असून माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातूनही एमबीए केले आहे.

माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पुतणी आहेत.