त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरतं कडुनिंब ! जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कडुनिंब ही खूप औषधी वनस्पती आहे. चरकसंहिता या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात त्याचा उल्लेख रोग निवारिणी तथा आरिष्ट असा केला आहे. कडुनिंब या झाडाची मुळं, खोड, खोडाची साल, डिंक, पान, फुलं, फळे त्यापासून काढलेले तेल व तेल काढून राहिलेली पेंड अशी प्रत्येक गोष्ट अनमोल आहे. त्यामुळंच त्याला एक वृक्ष औषधालय असंही म्हणतात.

कडुनिंबाच्या पानात बुरशीनाशक आणि जंतूनाशक गुणधर्म आहेत. त्यामुळंच त्वचा आणि केस यांच्या अनेक व्याधींवर लिंबोणी पर्णरसाचा उपयोग केला जातो. त्वचेवरील कोरडेपणा आणि खाज दूर करण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. कडुनिंब पेस्टचा हेअर कंडिशनर म्हणून उपयोग केला जातो.

चेहऱ्यावर असणाऱ्या तारुण्यपिटीकांवर लिंबोणी तेलाचा उपयोग खूप परिणामकारक ठरतो. कडुनिंबाचे तेल हे अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल, अँटी मायक्रोबियल आहे त्यामुळं अनेक प्रकारच्या त्वचारोगांवर हे तेल रामबाण उपाय ठरतं. खास बात अशी की, तेल लावल्यांतर ती व्याधी पुन्हा उद्भवत नाही. कडुनिंबाच्या तेलात फॅटी ॲसिड आणि ई जीवनसत्व असतं. ते त्वचेत अगदी सहज आणि वेगानं शोषून घेतले जातात. त्यामुलं खरूज, नायटा अशा व्याधी देखील सहज बऱ्या होतात.

कडुनिंबाची पानं चवीला कडू असली तरी त्याचे फायदे अनेक आहेत. शरीरातील अंतर्गत व्याधींपासून त्वचेच्या आजारांपर्यंत कडुनिंबाचे अनेक फायदे आहेत. निसर्गानं कडुनिंब बनवलं ते माणसाला निरोगी ठेवण्यासाठीच. रोज जर 2 कडुनिंबाची पानं खाल्ली तरी तुमचं आरोग्य उत्तम राहिल. कोणता आजारही तुम्हाला होणार नाही.

शेतीसाठी उपयोग
कडुनिंब पर्णरस आणि तेल यांचा वापर शेतीसाठीही मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण ते जंतुनाशक, कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहे. शेतकऱ्याला आपल्या शेतावरच पिकावरील रोगप्रतिबंधक आणि रोगनाशक औषधं निर्माण करता येतात. बाजारातून औषधं विकत आणण्याची गरज नाही. शिवाय कडुनिंबाची पेंड हे नायट्रोजनयुक्त उत्कृष्ट सेंद्रीय खत आहे. रासायनिक युरिया खतापेक्षा ते अधिक गुणकारी आहे.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.