महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या ‘या’ प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक, कोरोना Test शिवाय No Entry

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने एक आदेश जारी केला आहे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणा-या रेल्वे प्रवाशांना आता कोरोना चाचणीचे RTPCR निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. तसेच हे RTPCR प्रमाणपत्र प्रवासाच्या दिवसापासून 72 तासांपेक्षा जुने असता कामा नये असे स्पष्ट बजावले आहे. त्यामुळे आता रेल्वेने प्रवास करतेवेळी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवास करणा-या प्रवाशांना कोरोनाचे निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे. त्याशिवाय प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

तर घटनात्मक कार्य करणारे आणि आरोग्य सेवा व्यावसायिक, 2 वर्षाखालील मुले आणि गंभीर आपत्कालीन परिस्थितीत (जसे कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय उपचार इत्यादी) प्रवाशांना RTPCR चाचणीतून सूट दिली आहे. अशा प्रवाशांचे स्थानकावर स्वॅब घेवून तपासाणी केली जाईल. यासोबत आवश्यक लागणारी कागदपत्रे जसे फोन नंबर, पत्ता इत्यादी हे त्यांच्या आयकार्ड सोबत सत्यापित करण्यात येईल. आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर राज्य शासनाच्या प्रोटोकॉलनुसार पुढील कार्यवाही केली जाईल असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.