बॉलिवूडमधून ‘गायब’ झालेल्या ‘या’ अभिनेत्रीने मनोज वाजपेयीशी केलं दुसरं लग्न

मुंबई, ता. २३ : पोलीसनामा ऑनलाइन : निरागस चेहऱ्याच्या नेहाला बघितल्यानंतर विधु विनोद चोप्रा यांचा शोध थांबला. कारण ते ‘करीब’ सिनेमासाठी एक नवीन चेहरा शोधत होते. नेहाने ‘करीब’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ‘होगी प्यार की जीत’, ‘फिजा’, ‘राहुल’, ‘आत्मा’ अशा चित्रपटात ती दिसली. पण तिला बॉलिवूडमध्ये जम बसवता आला नाही. शेवटची नेहा ‘अ‍ॅसिड’ फॅक्टरी सिनेमात दिसली होती

नेहाचा जन्म एका मुस्लिम घरात झाला आहे. तिचे खरे नाव शबाना रजा आहे. तिने तिचे नाव का बदलले, यामागेही कारण आहे. होय, नेहा चित्रपटसृष्टीत आली, तेव्हा तिला तिचे नाव बदलण्याची मुळीच इच्छा नव्हती. एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला होता. माझ्या आईवडिलांनी मोठ्या प्रेमाने माझे शबाना नाव ठेवले होते. पण चित्रपटात आल्यानंतर नाव बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि मला माझे नाव बदलावे लागले,असे तिने सांगितले होते.

 

 

 

नेहाने एप्रिल २००६ मध्ये तिने अभिनेता मनोज वाजपेयीसोबत लग्न केले. यानंतर चित्रपटांना तिने कायमचा रामराम ठोकला आणि संसारात रमली. लग्नापूर्वी सुमारे सात वर्षे नेहा आणि मनोज रिलेशनशिपमध्ये होते. नेहा आणि मनोजला एक मुलगी असून तिचं नाव नैला आहे. बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर नेहा अनेकवेळा मनोजच्या सिनेमांच्या स्पेशल स्क्रिनिंगला त्याच्यासोबत दिसते. मनोज वाजपेयीचे हे दुसरे लग्न आहे. मनोज वाजपेयीचे दिल्लीतल्या एका मुलीशी लग्न झाले होते पण स्ट्रगलिंगच्या दिवसात त्यांचा घटस्फोट झाला.