‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे आऊट 

मुंबई :वृत्तसंस्था

सलमान खानच्या ‘बिग बॉसच्या १२ व्या सिझनमधून  मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे बाद झाली आहे. अवघ्या २८ व्या दिवशी नेहाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागल्यामुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत. सुरूवातीपासूनच स्वत:ला कोणत्याही वादात ओढून न घेता नेहा स्वत:च्या पद्धतीनं हा खेळ खेळत होती. ‘बिग बॉस’च्या घरातील नेहाची एक्झिट ही अर्थातच तिच्या चाहत्यांसाठी जबरदस्त धक्का मानला जातो.

विकेंड का वार’मध्ये अभिनेता करणवीर बोहरा आणि नेहा हे दोघं अंतिम दोन स्पर्धकांमध्ये होते. नेहा पेंडसेने सुरुवातीपासूनच चांगला खेळ खेळत प्रेक्षकांची मनं जिंकली होती.सुरूवातीपासून स्वत:ला कोणत्याही वादात न ओढता सेफ गेम नेहानं खेळला. मात्र नेहाने घेतलेल्या मानधनाच्या तुलनेत ‘वादंग’ न निर्माण झाल्यामुळे तिला बिग बॉसकडून नॉमिनेट करण्यात आलं .नेहाला प्रेक्षकांकडून करणवीरच्या तुलनेत कमी मतं पडली त्यामुळे तिला घरातून बाहेर पडावं लागलं.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e58091f-d07c-11e8-affe-852814dec184′]
आतापर्यंत एमटीव्ही रोडीजची स्पर्धक कृती वर्मा, व्यावसायिक रोशमी बानिक, पोलिस निर्मल सिंग हे स्पर्धक ‘बिग बॉस १२  मधून बाहेर पडले आहेत. नेहा ही बाद  झालेली पहिलीच सेलिब्रेटी ठरली. आता अनुप जलोटांसोबत श्रीशांतही बिग बॉसच्या घरातील सिक्रेट रुममध्ये राहत आहे.

मराठीसोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही नेहा प्रसिद्ध आहे. १९९६  मध्ये  ‘हसरतें’ या हिंदी मालिकेत नेहाने बालकलाकार म्हणून भूमिका केली होती. त्यानंतर ‘मे आय कम इन मॅडम?’ या विनोदी  मालिकेतून तिनं हिंदी प्रेक्षकांमध्येही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. फॅमिली टाईम विथ कपिलमध्येही नेहा दिसली होती. प्यार कोई खेल नही, देवदास, दिल तो बच्चा है जी अशा बॉलिवूडपटांमध्येही ती झळकली होती. त्याशिवाय तिने तामिळ, तेलुगू, मल्ल्याळम सिनेमातही काम केलं आहे.