अहमदनगर : ‘ती’ महिला अधिकारी सक्तीच्या रजेवर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. नावंदे यांच्या बदलीच्या मागणीसाठी क्रीडा संघटनेचे शिष्टमंडळ काल पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून क्रीडा व शालेयशिक्षणमंत्री आशिष शेलार यांना भेटले होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांची बदली करावी, या मागणीसाठी शहरातील सक्कर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून क्रीडा संघटनांकडून नावंदे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका सुरू आहे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनीही क्रीडा संघटनांच्या भूमिकेची बाजू घेत जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नावंदे यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी, या मागणीसाठी क्रीडा संघटनांच्या शिष्टमंडळाने काल पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून क्रीडा व शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना भेटले.

क्रीडा संघटनांनी नावंदे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करून त्यांच्या मनमानी कारभाराची तक्रार केली होती. शेलार यांनी तक्रारीची दखल घेऊन नावंदे सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. नावंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर क्रीडा संघटनांनी समाधान व्यक्त केले असून, त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू राहणार असल्याचे संघटनांच्यावतीने सांगण्यात आले.

मार्च 2019 मध्ये नावंदे या जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. नियुक्तीनंतर त्यांचे क्रीडा संघटनांसोबत मतभेद झाले. त्यानंतर क्रीडा संघटनांनी नावंदे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेऊन त्यांच्या बदलीची मागणी सुरू केली.

आरोग्यविषयक वृत्त –