कामाची गोष्ट ! स्मार्टफोनची बॅटरी ‘डाऊन’ झालीय तर ‘नो-टेन्शन’, आता 5 दिवस राहणार मोबाईल ‘चार्ज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मार्टफोन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सध्या वापरण्यात येणाऱ्या मोबाइलमध्ये अनेक फीचर असतात. त्यामुळे फोनची बॅटरी लवकर कमी होते आणि आवश्यक वेळी स्मार्टफोन बंद होतो. परंतु आता स्मार्टफोन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता चार्जिंगचे टेंशन घेण्याची गरज नाही. कारण आता बॅटरीची क्षमता वाढवणारं एक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. ज्याने तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी दिवसभर नाही तर 5 दिवस चालेल.

नव्या बॅटरी सोल्यूशनमध्ये ट्रॅडीशनल लिथियम आयर्न कॉम्बिनेशनच्या जागी नवे कॉम्बिनेशन यूजर्सला मिळणार आहे. आताच्या बॅटरी स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणे पेसमेकरला पॉवर देण्यासाठी वापरल्या जात होत्या. परंतु संशोधकांनी अल्ट्रा कॅपिसिटीसाठी लिथियम सल्फर कॉम्बिनेशनचा वापर केला आहे. स्मार्टफोनप्रमाणे बॅटरी विकसित करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाच्या रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार संशोधकांच्या एका गटाने सल्फर कॅथॉड्सच्या डिझाइनला रि – कॉन्फिगर करुन सध्याच्या बॅटरी कॉम्बिनेशनच्या जागी वापरले. यंदाच्या वर्षी या बॅटरीची चाचणी कार आणि ग्रिड्समध्ये केली जाणार आहे. एका वृत्तानुसार अ‍ॅण्ड्राइड फोनमध्ये स्क्रीन, डाटा, जीपीएस या तीन गोष्टीमुळे जास्त बॅटरीचा वापर होतो. त्यामुळे काही सेटिंग्स बदलल्या तर बॅटरीची क्षमता बऱ्यापैकी सुधारते.

मोबाइलची स्क्रीन आणि टच स्क्रिन हे अविभाज्य अंग आहेत. बटणाचे किपॅड असलेले फोन फारसे विक्री होत नाहीत. स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. स्मार्टफोनमध्ये ब्राइटनेस कायम ठेवण्यासाठी सर्वात जास्त बॅटरी लागते. अनेकदा ऑटो मोड ब्राइटनेसची सेटिंग असते त्यामुळे जास्त बॅटरी वापरली जाते. त्यामुळे मॅन्युअल सेटिंग्स ठेवल्यास बॅटरी लवकर संपत नाही.

डाटाचा वापर –
इंटरनेट डाटाचा वापर वाढला आहे. आता फोनचा वापर फक्त बोलण्यापूरताच होत नाही. त्यामुळे इंटरनेट डाटाचा वापर केल्याने बॅटरी जास्त वापरली जाते. इंटरनेट डाटा सुरु राहिल्याने मोबाइल सतत नेटवर्क शोधतो. त्यामुळे बॅटरीचा वापर जास्त असतो.

जीपीएसचा वापर –
सध्या जीपीएसचा वापर वाढला आहे, जीपीएस सतत ऑन ठेवला जातो. त्यामुळे मॅप आणि नेव्हिगेशन वापरताना जीपीएस सुरु राहते, त्यामुळे बॅटरीचा वापर वाढतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/