खुशखबर ! घरबसल्या महिन्याला 70 हजार कमविण्यासाठी ‘हा’ व्यवसाय करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमचे घर किंवा एखादी रुम रिकामी पडून असेल तर तुम्ही तुम्हाला त्यातून कमाई करण्याची मोठी संधी आहे. रुम भाड्याने देणे या साधारण पर्याय सोडून तुम्ही त्यापेक्षा आधिक कमाई करु शकतात. यातून तुम्हाला नक्की कमाई करता येईल.

आपल्या रिकाम्या जागेवरुन कमाई करण्यासाठी तुम्हाला तुमची रुम हॉटेल रुम बुकिंग साइटवर लिंक करावी लागेल. त्यानंतर तुम्ही तुमची रुम भाड्याने देऊ शकतात. अनेकांनी या व्यवसायातून मोठी कमाई केली आहे. यासाठी आपल्याला गोआयबीबो, ट्रिप एडवाइजर, होमस्टे. कॉम, बुकिंग. कॉम या वेबसाइटवर लिंक टाकावी लागेल.

असे करा घर लिंक –
अनेक राज्यांमध्ये सर्वात आधी आपल्या प्रॉपर्टीची वेबसाइटवर नोंद करावी लागेल, त्यासाठी ऑनलाइन एक परमिट देण्यात येईल. प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आहेत. काही राज्यात लोकांना जिल्हा टूरिस्ट ऑफिसमध्ये देखील जावे लागते. अनेक राज्यात या व्यवस्थेला कमर्शिअल मानण्यात येत नाही. यामुळे तेथे यासाठीचा कोणाताही सेवा कर देण्यात येत नाही.

याची काळजी घ्या –
ज्या वेबसाइटवर तुम्ही रुम किंवा घर लिंक करत आहेत तेथे तुमच्याकडून कमीशन घेण्यात येईल. हे कमीशन विविध वेबसाइटवर वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी हे ३-६ टक्के कमीशन घेण्यात येते. त्यामुळे हे लक्षात ठेवा की लहान जागा असल्यास तुम्हाला त्याचे भाडे देखील कमीच मिळणार. जागा पर्यटन स्थळाच्या जवळ असल्यास त्याचा फायदा तुम्हाला अधिक होईल.

आरोग्य विषयक वृत्त

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक

‘हे’ खाद्यपदार्थ सेवन केले तर कर्करोगापासून होईल संरक्षण

आरोग्यसेवेत केरळ नंबर १ वर, महाराष्ट्राचे स्थान कितवे ?

शहरातील ६० टक्के नागरिक घेतात फक्त ५ तासाची झोप, मधुमेह व मेंदूविकारात वाढ